AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran, israel, war : इराणमध्ये गृहयुद्ध होणार? कोण आहेत कुर्द, अमेरिका इराणविरोधात त्यांची ढाल वापरणार ?

मध्य पूर्वेत सुरु असलेल्या संघर्षात इराण समोर आता एक मोठी समस्या उभी राहिली आहे. कुर्दिश बंडखोर या लढाईत सामील होऊ शकतात. चला तर पाहूयात कोण आहेत कुर्द ?

Iran, israel, war : इराणमध्ये गृहयुद्ध होणार? कोण आहेत कुर्द, अमेरिका इराणविरोधात त्यांची ढाल वापरणार ?
Kurds In Iran
| Updated on: Mar 08, 2026 | 4:16 PM
Share

Kurds In Iran: मध्य पूर्वेत इराणवर इस्राईल – US ने केलेल्या हल्ल्यात इराण खूपच आक्रमक निघाल्याने अमेरिका पेचात सापडली आहे. आता येथील भौगोलिक स्थितीचा एक नवा डाव अमरिका मांडण्याच्या तयारीत आहे. बातमीनुसार कुर्दिश लढवय्ये आता युद्धात एक्टीव्ह होऊ शकतात. असा दावा केला जात आहे की पाश्चात्य शक्ती आता कुर्दिश गटाची मदत घेण्याच्या विचार करीत आहेत. त्यामुळे इराणच्या गोटात तणाव पसरला आहे,चला तर पाहूयात कुर्दीश नेमके कोण आहेत आणि त्यांचा इराणला का धोका आहे.

कोण आहेत कुर्द?

कुर्द एक एथेनिक गट असून त्यांची भाषा, संस्कृती आणि स्वतंत्र परंपरा आहे. त्यांची भाषा इंडो युरोपियन भाषिक कुटुंबातील इराणी शाखेशी जोडलेली आहे. अनेक संपूर्ण इलाख्यात अनेक बोली भाषेत विभागली आहे. असे म्हटले जाते की जगभरात कुर्द लोकसंख्या २५ ते ४५ दशलक्ष दरम्यान शिल्लक आहे. त्यातील बहुतांशी कुर्दिश तुर्की, इराण, इराक आणि सिरीयाच्या पर्वतमय प्रांतात विखुलेले आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या असून त्यांचा स्वत:चा स्वतंत्र देश नाही. अनेक दशकांपासून कुर्द ग्रुप कुर्दिस्तान नावाचा एक स्वतंत्र देश बनवण्याची चळवळ करत आहेत.

कुर्द लोकसंख्या कुठे जास्त

कुर्द लोकसंख्या मध्य पूर्वेतील चार मोठ्या देशात पसरलेली आहे. येथे ते बहुतांशी एथनिक मायनॉरिटी म्हणून जगत आहेत. तुर्कीत जगातील सर्वाधिक कुर्द लोकसंख्या राहाते. इराण हा शिया बहुल देश आहे तर कुर्दिश हे बहुसंख्य सुन्नी बहुल आहेत. त्यांची लोकसंख्या १५ ते २० दशलक्ष आहे. कुर्द कम्युनिटी बहुतांशीदेशाच्या दक्षिण पूर्व भागात रहातात.

इराणमध्ये कुर्द लोकसंख्या ८ ते १२ दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. ही संख्या देशाच्या लोकसंख्येच्या १० टक्के आहे. बहुतांशी इराणी कुर्द इराकी सीमेच्या जवळ पश्चिम प्रांतात राहातात. इराकमध्ये कुर्द समुदायाला सर्वात उच्च लेव्हलची पॉलिटीकल ऑटोनॉमी मिळवली आहे. कुर्दिस्तान रिजनल गर्व्हमेंट उत्तरी इराकच्या एका सेमी ऑटोनॉमस भागात चालते. सिरीयामध्ये सुमारे दीड ते अडीच दशलक्ष कुर्द आहेत. ही बहुतांशी देशाच्या उत्तर पूर्व भागात रहाते.

कुर्दिस्तानचं स्वप्न

कुर्द लोकांनी स्वतंत्र देशाची मागणी २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून सुरु केली आहे. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्य समाप्त झाल्यानंतर एक स्वतंत्र कुर्द देश स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. १९२० मध्ये सेव्रेशच्या करारात काही असेही नियम होते. ज्यामुळे कुर्दिस्थान स्थापन होऊ शकले असते. परंतू जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट आणि नंतरच्या करारानंतर कुर्द इलाख्याला देशात विभागले गेले. मग तेव्हापासून वेगवेगळ्या देशात कुर्दिश आंदोलन बहुतांशी ऑटोनॉमी, पॉलिटिकल अधिकार वा संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.

इराणला का आहे धोका ?

इराणमध्ये कुर्द लोकसंख्येचा सेंट्रल गव्हन्मेंटसोबत दीर्घकाळानंतर एक मुश्कील नाते राहिले आहे. अनेक कुर्द ग्रुप सुन्नी मुसलमान आहेत. आणि इराणच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये शिया लिडरशिपचा दबदबा आहे.काही कुर्द संघटनांनी सरकारवर भेदभाव आणि पॉलिटिकल रुपाने फाटाफूट केल्याचा आरोप लावला आहे.

असे म्हटले जात आहे की जर कुर्द ग्रुप रिजनल भांडणात एक्टिव्हली सामील झाले तर ते इराणसाठी मोठे आव्हान ठरु शकतात. आजुबाजूच्या भागात कुर्द बंडखोरांकडे आधीच संघटित मिलिशिया आणि ट्रेंड फोर्स आहेत. जर कुर्द रिबेलियन गटांनी सीमावर्ती भागातून संघटित ऑपरेशन सुरु केले तर इराणला बाहेरील युद्धाशी लडताना अंतर्गत बंडाळीला निपटण्यासाठी मिलिट्री रिसोर्सेज लावावे लागतील असे म्हटले जात आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप