AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांचा इशारा, अखेर, 23 जिल्ह्यात मोठा अलर्ट, पुढील 8 तासात..

India Meteorological Department Warning : राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांचा इशारा, अखेर, 23 जिल्ह्यात मोठा अलर्ट, पुढील 8 तासात..
Rain
| Updated on: Sep 20, 2026 | 7:55 AM
Share

ऑगस्ट महिन्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. मॉन्सून राज्यात उशीरा दाखल झाला. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरली. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी असण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. पिके संकटात आली आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी राजा चिंतेत आहे. दुष्काळ जाहिर करण्याची मागणी राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. मराठवाडा आणि विदर्भात स्थिती अधिक गंभीर आहे. 32 जिल्हात दुष्काळाची स्थिती आहे. एल निनोचा परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर झाल्याचे सांगितले जातंय. त्यातच आता भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकारप वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी, हिंगोली, नाशिक घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली. पुढील 8 तास पावसाचा जोर अधिक असण्याचा अंदाज आहे.

नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. आज शहरासह जिल्ह्यात हलका पाऊस अपेक्षित आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरास आजसुद्धा दमदार सरींचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या परिसरात वाऱ्याचा वेग ताशी 30-40 व 40-50 किमी इतका राहू शकतो. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. आज आणि उद्या दोन्ही दिवस राज्यातील विविध भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी