Chandrapur : आजोबांच्या तेराव्याला आलेल्या नातवावर काळाचा घाला, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू

| Updated on: Mar 31, 2022 | 8:54 AM

आजोबांच्या तेराव्याला आलेल्या नातवाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यूची झाल्याची घटना समोर आलीय. चंद्रपुरच्या ऊर्जानगर ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याची ही घटना आहे.

Chandrapur : आजोबांच्या तेराव्याला आलेल्या नातवावर काळाचा घाला, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू
प्रतिनिधीक फोटो
Image Credit source: social
Follow us on

चंद्रपूर : आजोबांच्या तेराव्याला आलेल्या नातवाचा बिबट्याच्या (leopard )हल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. चंद्रपुरच्या (Chandrapur) ऊर्जानगर ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू (child death) झाल्याची ही घटना आहे. प्रतिक बावणे असं 8 वर्षीय बालकाचं नाव असून तो ग्रामपंचायत हद्दीतील नेरी वॉर्ड 6 मध्ये आजोबाच्या मृत्यूनंतर कार्यक्रमासाठी आला होता. मूळ भद्रावती निवासी प्रतीक घराबाहेर खेळत असताना संध्याकाळी अचानक बिबट्याने त्याला उचलून नेलं. त्यानंतर त्याने आरडाओरड करताच शेजारी आणि नातेवाईकांनी धावाधाव करायला सुरुवात केली. लगेच मागील भागात असलेल्या जंगलाकडे धाव घेण्यात आली. लागलीच वनविभागाला पाचारण करण्यात आलं. मात्र, शोधमोहीम प्रतिकचा घरापासून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. संतप्त नागरिकांची वनविभाग आणि प्रशासनाविरोधात नारेबाजी घटनास्थळी पहायला मिळाली. यावेळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

तेराव्याला आलेल्या नातवाचा मृत्यू

प्रतिकच्या आजोबांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे आजोबांच्या मृत्यूनंतरच्या कार्यक्रमासाठी तो आपल्या आजोळी आला होता.  मात्र, आजोबांचे गाव असलेल्या चंद्रपुरच्या ऊर्जानगर ग्रामपंचायत हद्दीत त्याचा मृत्यू ओढवला. रात्री खेळत असताना बिबट्याने त्याला उचलून नेलं. आरडाओरड लक्षात आल्यानंतर नातेवाईक आणि आजोबांच्या घराजवळील लोकांनी प्रतिकचा शोध सुरू केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. प्रतिकचा घरापासून 500 मिटर अंतरावर मृतदेह आढळून आला. आजोबांच्या कार्यक्रमाला आलेल्या प्रतिकचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नातवाईकांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

वनविभागाला पाचारण केल्यावर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, या दरम्यान घरापासून 500 मीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. यानंतर संतप्त नागरिकांनी या भागातील कोळसा खाण परिसरातील काटेरी बाभळीच्या जंगलाला आग लावली. याठिकाणी काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, काही वेळात बाभळीच्या जंगलाला लावलेल्या आग अटोक्यात आणण्यात आली. सध्या वनविभाग आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू आहे.

प्रशासनाचा निष्काळजीपणा?

बिबट्याच्या हल्यात प्रतिकचा मृत्यू झाला. मात्र, ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात वाघ आणि बिबटे यांच्या हल्ल्यात नागरिकांचे मृत्यू झाल्यानंतर मोठे आंदोलन झाले होते. परिणामी वनविभागाने एक वाघ आणि 2 बिबटे यांना जेरबंद केले. मात्र हल्ल्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिक संतापले आहेत. बिबट्याच्या हल्यात नागरिकांचे जीव जात असल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केलीय. आता यावर प्रशासन काय पाऊलं उचलणार, ते पहावं लागेल.

इतर बातम्या

Video : मुलगा देवपूजेला करतो टाळाटाळ… मग काय घडतं? वनिताताईं पाटील यांनी सांगितली मजेशीर कथा; Kirtan viral

IPL 2022, Orange Cap: RCB चा पहिला विजय, फाफ डु प्लेसी ऑरेंज कॅपचा मानकरी, पर्पल कॅपमध्ये कोण आघाडीवर? जाणून घ्या…

Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!