Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Image Credit source: TV9 Marathi

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत.

अजय देशपांडे

|

Mar 31, 2022 | 7:50 AM

Petrol, Diesel Price Hike : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या 22 मार्चपासून तब्बल नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.94 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6. 84 रुपयांची वाढ झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील इंधनाचे दर

आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 84 पैशांची तर डिझेलच्या दरात देखील 84 पैशांचीच वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 116.72 रुपये तर डिझेल 100.94 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 116.53 आणि डिझेल 99.23 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 115.71 तर डिझेल 98.47 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 115.37 आणि 98.12 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 115.80 रुपये लिटर आणि डिझेल 98.37 रुपये लिटर इतके आहे.

या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा अधिक महाग

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये नऊवेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या दहा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल 6.84 रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.

संबंधित बातम्या

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

रशिया, युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेला फटका, पुढील वर्षी आर्थिक वृद्धी दर 7.6 टक्के राहण्याचा ‘इंडिया रेटिंग्स’चा अंदाज

क्रिप्टो करन्सी सरकारी निर्बंधांच्या कचाट्यात; कशी आहे भारतातील स्थिती?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें