आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, ...तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN-Aadhaar link) लिंकिंग सक्तीचे केले आहे. तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड 31 मार्चपर्यंत आधार कार्डला लिंक केले नाही तर तुम्हाला 31 मार्चनंतर देखील आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी संधी मिळणार आहे.

अजय देशपांडे

|

Mar 31, 2022 | 7:25 AM

आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN-Aadhaar link) लिंकिंग सक्तीचे केले आहे. तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड 31 मार्चपर्यंत आधार कार्डला लिंक केले नाही तर तुम्हाला 31 मार्चनंतर देखील आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला दंड (PAN-Aadhar non link Penalty) भरावा लागणार आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर 30 जून 2022 पर्यंत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तुम्ही जर 30 जून 2022 नंतर पॅन कार्डला आधार लिंक केले तर मात्र तुम्हाला एक हजारांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तुम्ही जर 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन बंद (Inactive PAN) होणार नाही, मात्र तुमच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

…तरीही भरता येणार इनकम टॅक्स रिटर्न

जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तरी देखील तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरणे, इनकम टॅक्स रिफंड यासारखी कामे करू शकणार आहात. 2023 मध्ये देखील तुमचे पॅन कार्ड चालूच राहणार आहे. मात्र 31 मार्च 2022 नंतर 30 जून 2022 पर्यंत तुम्हाला पॅन आधारला लिंक करण्यासाठी पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर त्यानंतर या दंडामध्ये वाढ होणार असून, एक हजारांचा दंड भरावा लागेल. आज आधार कार्डला पॅन कार्ड मोफत लिंक करण्याचा शेवटचा दिवस आहे. या संधीचा पॅन कार्ड धारकांनी फायदा घ्यावा असे आवाहन आयकर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

43.34 कोटी पॅन आधारला लिंक

इनकम टॅक्स विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 24 जानेवरी 2022 पर्यंत तब्बल 43.34 पॅन कार्डधारकांनी आपले पॅन आधारला लिंक केले आहेत. देशात आतापर्यंत 131 कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असून, आधारला पॅन लिंक केल्यास पॅन कार्डचा गैरवापर थांबवने सहज शक्य होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केल्यास कर चोरीला देखील आळा बसणार आहे.

संबंधित बातम्या

रशिया, युक्रेन युद्धाचा अर्थव्यवस्थेला फटका, पुढील वर्षी आर्थिक वृद्धी दर 7.6 टक्के राहण्याचा ‘इंडिया रेटिंग्स’चा अंदाज

क्रिप्टो करन्सी सरकारी निर्बंधांच्या कचाट्यात; कशी आहे भारतातील स्थिती?

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला… काय आहेत नेमकी कारणं?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें