AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Loan EMI : EMI हुकला तरी घर होणार नाही जप्त, कुणालाच माहिती नसलेली फक्त ही ट्रिक वापरा!

अनेकदा आर्थिक अडचणीमुळे तुम्ही घराचा ईएमआय भरू शकत नाही. अशा स्थितीत बँक तुम्हाला थेट नोटीस पाठवते. ईएमाय भरणे शक्य न झाल्यास नेमकं काय करावं? हे जाणून घेऊ या...

Bank Loan EMI : EMI हुकला तरी घर होणार नाही जप्त, कुणालाच माहिती नसलेली फक्त ही ट्रिक वापरा!
bank loan emiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 23, 2026 | 9:06 PM
Share

Bank EMI : अनेकदा पगार उशिरा झाला की तुमचा ईएमआय भरायचा राहून जातो. EMI ची तारीख निघून गेली की नंतर तुमच्या कर्जाच्या खात्यावर ओव्हरड्यू दाखवला जातो. अगोदर तुम्हाला मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून तुम्हाला EMI भरा अशी आठवण करून दिली जाते. परंतु पुढच्या काही दिवसांनीदेखील तुम्ही EMI न भरल्यास बँकेची कलेक्शन टीम तुम्हाला कॉल करून हप्ता न भरण्याचे कारण विचारायला लागते. या कालात EMI ची तारीख चुकवल्यामुळे तुम्हाला पेनाल्डी लागते. तुमच्याकडे EMI चुकवल्यामुळे अतिरिक्त पैसे मागितले जातात.

ईएमआय न भरू शकल्यास काय तोटा होतो?

EMI चुकवल्यामुळे घेण्यात येणारी दंडात्मक रक्कम ही कर्ज आणि व्याजापेक्षा वेगळी असते. तुम्ही एखादा EMI चुकवल्यास तुम्हाला दंड तर भरावा लागतो. शिवाय तुमचा इतरही काही बाबतीत तोटा होतो. तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. तुमचा क्रेडिट स्कोअरही कमी होतो. तुम्ही एका महिन्याच्या आत राहिलेला EMI भरल्यास फारसा फरक पडत नाही. परंतु EMI त्यापेक्षा लेट झाल्यास तुमचा सिबील स्कोअर फार लवकर घसरतो. परिणामी तुम्हाला भविष्यात बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात.

EMI एखादा महिना न भरल्यास तुमच्याविरोधात….

तुमच्या घराच्या कर्जाचा EMI भरायचा राहून गेल्यास तुम्हाला बँक लगेच नोटीस पाठवतो. बँकेच्या नियमानुसार तुम्ही सलग 90 दिवस कर्जाचा EMI भरू न शकल्यास तुमचे कर्ज हे एनपीए म्हणून गृहित धरले जाते. त्यानंतर तुमच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया केली जाते. म्हणजेच घराचा EMI एखादा महिना न भरल्यास तुमच्याविरोधात मोठी कारवाई होत नाही. बँका तुमचे घर लगेच जप्त करू शकत नाहीत. परंतु तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

EMI न भरू शकल्यास नेमकं काय करावं…

काही कारणास्तव तुम्ही ईएमआय न भरू शकल्यास लगेच बँकेशी संपर्क करावा. त्यानंतर EMI का भरू शकलो नाही, याचे योग्य कारण सांगावे. तसेच लवकरात लवकर थकलेला कर्जाचा हप्ता भरून टाकावा. ईएमआय भरताना दंडात्मक रक्कमही भरून टाकावी. तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर तुम्ही रि-शेड्यूलिंग किंवा मोरेटोरियम यासारख्या पर्यायांवर विचार करू शकता. त्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत सापडणार नाही.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.