AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

रशियाने युद्धाच्या काळात पाकिस्तानला सवलतीच्या दरात तेल उपलब्ध करून दिले होते, त्यानंतर आता रशियाकडून आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा मोठा फयादा पाकिस्तानला होणार आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा
Vladimir Putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 10, 2026 | 5:26 PM
Share

भारताचा मित्र रशिया सध्या पाकिस्तानवर जास्तच खूश असल्याचं पहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असताना मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे आखाती देशांमधून येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं. अशा स्थितीमध्ये भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली. युद्धापूर्वी रशिया भारताला सवलतीच्या दरात तेल पुरवठा करायचा मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी सवलतीच्या दरात तेल पुरवठा करण्यास नकार दिला, तेलाचे दर वाढवले. हा भारतासाठी रशियाचा धक्का होता. मात्र दुसरीकडे रशियाने पाकिस्तानला या काळात स्वस्त दराने तेल पुरवठा केला. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी मोठी घोषणा केली आहे.

रशियाने पाकिस्तानला मोठा दिलासा दिला आहे. रशियाकडून पाकिस्तानमधील बटाट्याच्या आयातीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मात्र आता रशियाने हे सर्व प्रतिबंध हटवल्याने पाकिस्तानचा रशियाला बटाटे विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा फायदा होणार आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बटाट्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं. रशियाकडून आता निर्बंध हटवण्यात आल्याने पंजाबमधून थेट रशियामध्ये बटाट्याची निर्यात होणार आहे. पाकिस्तानमधील शाहबाज सरकारकडून याच वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाला या संदर्भात विनंती करण्यात आली होती, त्यानंतर रशियानं आता पाकिस्तानवरील निर्बंध हटवले आहेत.

रशियानं पाकिस्तानच्या बटाट्यावरील निर्बंध हटवल्यानंतर आता पाकिस्तानमधील बटाट्याची पहिली खेप रशियामध्ये पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या बटाट्यामध्ये किटकनाशकाची मात्रा अधिक प्रमाणात आढळून आल्यानं रशियाने पाकिस्तानवर कारवाई केली होती. रशियामध्ये पाकिस्तानी बटाटे बॅन करण्यात आले होते. मात्र आता रशियानं पाकिस्तानवरील निर्बंध मागे घेतले आहेत, आता पाकिस्तानला रशियाला बटाटे निर्यात करता येणार आहेत. यापूर्वी रशियाकडून पाकिस्तानला तेलाच्या दरात सूट देण्यात आली होती, त्यानंतर आता बटाट्याच्या आयातीवरील निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?