AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

मागच्या दोन आठवड्यांपासून हा चित्रपट OTT वर नंबर 1 पोजिशनवर आहे. या चित्रपटात असं काय खास आहे की, भारतीय प्रेक्षकांना हा इतका आवडलाय. या चित्रपटाची कास्ट काय आहे?.

747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?
crime 101Image Credit source: IMDb
| Updated on: Apr 10, 2026 | 5:00 PM
Share

एखादा चित्रपट चालल्यानंतर त्याचं सर्वाधिक श्रेय दिग्दर्शकाला दिलं जातं. कारण दिग्दर्शक त्या चित्रपटाचा कॅप्टन असतोच. पण त्याच बरोबर प्रेक्षकांची अचूक नस ओळखण्याचं कसब त्याला साधावं लागतं. चित्रपट चांगला असेल पण चालला नाही काय उपयोग?. म्हणून बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. सध्या असाच एक हॉलिवूड चित्रपट भारतीय सिने रसिकांना खूप आवडलाय. क्राइम 101 असं या हॉलिवूडपटाचं नाव आहे. ओटीटी प्लेटफॉर्म प्राइम वीडियोवर या चित्रपटाने प्रेक्षकांवर गारुड केलय. रिलीजपासून हा चित्रपट ट्रेंड होतोय. मागच्या दोन आठवड्यांपासून हा चित्रपट OTT वर नंबर 1 पोजिशनवर आहे. या चित्रपटात असं काय खास आहे की, भारतीय प्रेक्षकांना हा इतका आवडलाय. या चित्रपटाची कास्ट काय आहे?.

क्राइम 101 हा एक क्राइम हिस्ट थ्रिलर चित्रपट आहे. बार्ट लेटन या चित्रपटाचा डायरेक्टर आहे. कथा, Action आणि प्रभावी कलाकार या चित्रपटाची मजबूत बाजू आहे. समीक्षकांना सुद्धा हा चित्रपट आवडला. त्यामुळे या चित्रपटाला हाय रेटिंग मिळाली आहे. क्रिस हेम्सवर्थ, मार्क रफलो, हेले बेरी, बॅरी कोगन सारख्या हॉलिवूड स्टार्सनी या चित्रपटात काम केलय. सर्व अभिनेत्यांनी दमदार अभिनय केलाय. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतोय.

या चित्रपटाची कमाई किती?

या चित्रपटात एका डायमंड चोराची कथा दाखवण्यात आलीय. तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चोरीची प्लानिंग करतो. त्यावेळी त्याची ओळख एका त्रस्त झालेल्या इंश्यूरन्स एजंट बरोबर होते. एक जिद्दी पोलीस डिटेक्टिव त्यांच्या मागे लागलेला असतो. स्टोरी जस जशी पुढे सरकते तसं चोर, एजंट पोलीस यांच्यामधील खेळ अजून खतरनाक होत जातो. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगली रेटिंग मिळाली आहे. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. जवळपास 90 मिलियन डॉलर म्हणजे 747 कोटी या चित्रपटाचं बजेट होतं. या चित्रपटाने 71.7 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 595 कोटी रुपये कमाई केली. या चित्रपटाला आपला पूर्ण खर्चही काढता आला नाही.

IMDb वर किती रेटिंग?

थिएटरमध्ये फ्लॉप झाल्यानंतर जेव्हा क्राइम 101 प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला, तेव्हा या चित्रपटाने कमाल केली. भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आणि फास्ट Action स्पीड आवडला. हेम्सवर्थ आणि मार्क रफलो यांची जोडी खूप भारी वाटली. Crime 101 हा तो चित्रपट आहे, जो थिएटरमध्ये चालला नाही पण OTT वर चित्रपट हिट झाला. IMDb वर या चित्रपटाला 6.9 रेटिंग मिळाली आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण...