AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. यावर आता CM फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

मोठी बातमी! विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला काय? CM फडणवीसांनी दिल्लीतून दिली सर्वात मोठी अपडेट
CM FadnavisImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 27, 2026 | 6:16 PM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. रोज अनेक नेत्यांच्या बैठका सुरू आहेत, मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार नाही हे अद्याप समोर आलेलं नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांना जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका. आमचं जवळपास एकमत झालेलं आहे.’ पुढे मुख्यमंत्री काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘जागावाटपावर आमचं जवळपास एकमत झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली आहे. त्यामुळे या दोनच गोष्टींवर आमचं आडलं आहे, यावर आम्ही तोडगा काढू. आता कठीण पेपर संपलेला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे फक्त, त्यानंतर विषय संपतील.’

भाजपची 48 नावांची यादी दिल्ली दरबारी

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत भाजप 11 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. अशातच आता एकूण 48 जणांच्या नावाची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्लीला गेले आहेत. ही यादी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली आहे. आता केंद्रीय नेतृत्व यावर चर्चा करून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे.

अद्याप जागावाटप ठरलेले नाही

अद्याप महायुतीचे जागावाटप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या फॉर्म्युलात भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला 2 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र आता हा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांना मान्य नसल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने किमान 6 ते 7 जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे अद्याप जागावाटप अंतिम होऊ शकलेले नाही.

CM फडणवीस काय म्हणाले?

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल