शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर… अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार; सुनेत्रा पवार यांनी दिली दिल्लीतील अपडेट
आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची ठरत आहे. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे.
आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे ही भेट खूप महत्त्वाची ठरत आहे. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, नेते हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील हजर होते. या बैठकी बाबत सुनेत्रा पवार नेमकं काय म्हणाल्या?
कांदा प्रश्नासह अनेक विषयांवर सर्व नेत्यांनी सकारात्मक चर्चा केल्याचं समोर येत आहे. यावेळी सुनेत्रा पवारांनी सांगितलं, की आम्ही अनेक मुद्दे मांडले. या बैठकीत कांद्याच्या दराचा मुद्दा महत्त्वाचा होता. येत्या 10 दिवसांत तोडगा निघेल असं आश्वासन मिळालं आहे. पुढे त्या म्हणाल्या, “या सकारात्मक बैठकीबाबत तसेच अनेक विषय नीट मांडता आले याबद्दल सरकार आणि अमित भाई यांचे मी आभार मानते.’
Published on: May 27, 2026 06:07 PM
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...

