AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?

| Updated on: Jul 10, 2026 | 10:39 AM
Share

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'ऑपरेशन टायगर' अद्याप सुरूच असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात असताना, नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’ अद्याप सुरूच असल्याचा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात असताना, नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यापूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 14 आमदारही शिंदे गटात सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत काही बैठका झाल्या असून, त्यामध्ये पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संभाव्य पक्षप्रवेश कधी होणार आणि कोणते नगरसेवक शिंदे गटात जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, या नगरसेवकांना प्रभागनिहाय पाच कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दाखवण्यात आल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याशीही शिंदे गटाची चर्चा झाल्याचे बोलले जात असून, या दाव्यांमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात असला, तरी याबाबत संबंधित नगरसेवक किंवा दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, काल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि मनपा गटनेते केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, पाणी साचणे आणि इतर नागरी समस्यांबाबत निवेदन सादर केले.

Published on: Jul 10, 2026 10:39 AM

Follow Us