INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय चर्चांना नवं वळण
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार गट) एकही खासदार आज दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह निलेश लंके आणि भास्कर भगरे हे खासदारही बैठकीपासून दूर राहणार आहेत. यामुळे आगामी विधेयकावरील पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीमध्ये आज सकाळी साडेअकरा वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार गट) एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले होते, परंतु पक्षाचा एक प्रतिनिधी उपस्थित राहील असे सांगण्यात आले होते. खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरे हे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निलेश लंके आज तोरणा किल्ल्यावर गडकिल्ले स्वच्छता मोहिमेसाठी गेल्याचे समोर आले आहे, तर भास्कर भगरे नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळतेय.
या घडामोडीमुळे शरद पवार गटाने इंडिया आघाडीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच एका विधेयकाबाबत पक्षाच्या भूमिकेवर सूचक वक्तव्य केले होते. आजच्या बैठकीतील अनुपस्थितीमुळे आगामी महत्त्वाच्या विधेयकावरील राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Nov 28, 2026 08:55 AM
INDIA आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार गटाची पाठ? डिलिमिटेशन विधेयकावरून...
.....मग भाजपला पाठिंबा का? काँग्रेसच्या त्या पोस्टने चर्चांना उधाण
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....

