AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?

Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?

| Updated on: Nov 28, 2026 | 9:25 AM
Share

जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा जाहीर केल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडताना पाहून मनाला दुःख होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकारणात नेमका कुणावर निशाणा साधला, याची चर्चा सुरू आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशनला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाच्या पायावर उभं असलेलं महाभारत घडतंय, अशी खंत व्यक्त केली आहे. रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे, त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला रामायण चित्रपट बघण्याचा आज योग आला. यातील राजा दशरथाने दिलेलं वचन आणि या वचनासाठी नीतिमत्तेला धरुन प्रभू श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झालो. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना आणि इतिहासाचाच संदर्भ घ्यायचा तर त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाच्या पायावर उभं असलेलं महाभारतच घडताना दिसतं आणि हे पाहून मनाला अतीव दुःख आणि वेदना होतात!” त्यांच्या या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण केला आहे.

Published on: Nov 28, 2026 09:25 AM

Follow Us