मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट; थेट म्हणाला, माझ्यासह आणखी…
राज्यात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या अल्पवयीन मुलाने CBI चौकशीत महत्त्वाची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
देशभरात चिंतेचा विषय असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या अल्पवयीन मुलाने CBI चौकशीत महत्त्वाची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ‘परीक्षेच्या सुमारे 10 दिवस आधीच त्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे प्रश्नपत्र संच उपलब्ध करून देण्यात आले होते. इतकेच नाही तर त्याच्यासह आणखी दोन मुलांना पेपर दिल्याचं मोटगावकरच्या मुलाने सीबीआयला सांगितलं.
शिवराज मोटेगावकर हा RCC कोचिंगशी संबंधित असून आपल्या मुलाला चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्याने मोठा गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. NEET पेपरफुटीचे धागेदोरे हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
CBI कडून पुण्यात मोटेगावकरच्या मुलाची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच प्रश्नपत्रिका खरेदी करणारे पालक आणि विद्यार्थीही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे सांगितले जात आहे.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
चक्क दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकर? नाशिकच्या अशोक खरात प्रकरण..
कुर्बानीचा वाद मीरा रोडवरून थेट घाटकोपरच्या सागर सोसायटीत, पोलिसांचा..

