AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravindra Chavan | रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात! विधान परिषद उमेदवारीवर मोठी अपडेट

Ravindra Chavan | रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात! विधान परिषद उमेदवारीवर मोठी अपडेट

| Updated on: May 27, 2026 | 3:51 PM
Share

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असतानाच आता उमेदवारांचा अंतिम फैसला दिल्ली दरबारातून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असतानाच आता उमेदवारांचा अंतिम फैसला दिल्ली दरबारातून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत महत्त्वाची चर्चा केली. यावेळी विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या तब्बल 48 नेत्यांची यादी पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील 17 जागांसाठी निवडणूक होणार असून त्यापैकी 11 जागा भाजप लढवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या जागांसाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून अनेक नेत्यांनी दिल्लीपर्यंत लॉबिंग सुरू केलं आहे. केंद्रीय नेतृत्व आता या 48 नावांवर चर्चा करून लवकरच अंतिम उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार गटाला 2 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा फॉर्म्युला फेटाळत शिवसेनेसाठी 6 ते 7 जागांची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीनंतर महायुतीचा अंतिम फॉर्म्युला काय ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: May 27, 2026 03:51 PM

Follow Us
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी