Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे…; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल करत, संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले. शंकराची वरात म्हणून आंदोलनाचे वर्णन करत, यात कोणीही सहभागी होऊ शकते असे त्यांनी स्पष्ट केले.b
इंडिया आघाडीने आज दिल्लीत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाचा मुख्य उद्देश निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करणे हा होता. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये खासदार एकत्र जमले आणि तिथून सर्वोच्च न्यायालयाकडे कूच केले.
यावेळी राहुल गांधींनी त्यांच्या आंदोलनाची तुलना शंकराच्या वरातीशी केली. आमचं आंदोलन शंकराची वरात आहे, यात कुणीही येऊ शकतं, असे ते म्हणाले. या आंदोलनात कोणतीही विशिष्ट योजना नसून ते एक तांडव असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान वाचवण्यासाठी हे आंदोलन असून, यात कोणत्याही पक्षाचे, धर्माचे, लिंगाचे लोक सहभागी होऊ शकतात, असे आवाहन त्यांनी केले. ज्ञानेश कुमार यांना थेट इशारा देत, राहुल गांधी म्हणाले की त्यांना सोडणार नाही आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. सरन्यायाधीशांनी याचिका दाखल करण्याची सूचना केली असून, त्यानुसार आज इंडिया ब्लॉकचे नेते एकत्रितपणे याचिका दाखल करणार आहेत.
Published on: Oct 12, 2026 02:20 PM
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप

