Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!

Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये सब्जाचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.
Image Credit source: TV9

सब्जाच्या बिया आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. सब्जा (Sabja seeds) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो. ते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात. मल्टीविटामिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 31, 2022 | 8:18 AM

मुंबई : सब्जाच्या बिया आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. सब्जा (Sabja seeds) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत अनेक फायदे देतो. ते अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जातात. मल्टीविटामिन्स व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह, फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. सब्जा टाइप 2 मधुमेह, कोलेस्टेरॉल (Cholesterol) आणि तणाव यासारख्या आरोग्य समस्या दूर करण्यास देखील मदत करतात. आपण याचे सेवन कसे करू शकता आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत ते जाणून घेऊया

सब्जा आहारात घेण्याची योग्य पध्दत

रात्री एक ग्लास पाण्यात 1 ते 3 चमचे सब्जा भिजवा. दुसऱ्या दिवशी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. हे पाणी प्या आणि बिया चघळल्याने आरोग्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामात आपण दुपारी देखील सब्जाचे सेवन करू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामात सब्जाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यास मदत करते

सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यात कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यात अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते. हे शरीरातील चरबी कमी करण्याचे काम करते. हे चयापचय गतिमान करते. याचे नियमित सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी

सब्जा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. त्यामुळे जर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सब्जाच्या बियांचे सेवन करू शकता.

पोटाच्या समस्या दूर होतात

सब्जा पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे देखील काम करते. सब्जा हे शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम करते. ते अॅसिडिटी, ब्लोटिंगची समस्या दूर करण्याचे काम करतात. ते पोट स्वच्छ ठेवतात.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

सब्जाच्या बिया केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. या बियांमध्ये प्रथिने, लोह आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. या बिया केसांना दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. त्वचेसाठी खोबरेल तेलात एक चमचा तुळशीचे दाणे मिसळा, गरम करा, गाळून घ्या. ते त्वचेवर लावा. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Health Care : मधुमेह व पायाचे आजार आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून सविस्तरपणे! 

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें