AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरहरी झिरवळ अडचणीत? सुनेत्रा पवारांनी बोलावली मुंबईत तातडीची बैठक, दिवसभर काय घडणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पहिली मोठी बैठक देवगिरीवर होत आहे. नरहरी झिरवळ लाचखोरी प्रकरण आणि नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत.

नरहरी झिरवळ अडचणीत? सुनेत्रा पवारांनी बोलावली मुंबईत तातडीची बैठक, दिवसभर काय घडणार?
narhari zirwal
| Updated on: Feb 16, 2026 | 9:47 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. सुनेत्रा पवार या नुकतंच मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानमंडळ सदस्य उपस्थित राहणार आहे. सुनेत्रा पवारांनी साप्ताहिक बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे.

पक्षांतर्गत शिस्त आणि रणनीती ठरवण्यासाठी बैठक

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता त्या पक्षाचा कार्यभारही खांद्यावर घेताना दिसत आहेत. आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीतील राजकारणाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. पक्षांतर्गत शिस्त आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार आहे.

नरहरी झिरवळांच्या प्रकरणावरही चर्चा?

या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरणावरही चर्चा केली जाणार आहे. मंत्रालयातील या प्रकरणानंतर झिरवळ चांगलेच अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल होते, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आज नरहरी झिरवळ स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोअर कमिटीसमोर त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. आता झिरवळ प्रकरणात नेमकी सत्यता काय आहे, याचा अहवाल सुनेत्रा पवार आणि कोअर कमिटीचे सदस्य या बैठकीत समजून घेणार आहेत.

दरम्यान पक्षाच्या अंतर्गत संरचनेतही मोठे फेरबदल होण्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी आणि कुठे घ्यायची, याची तारीख आज निश्चित केली जाऊ शकते. येत्या दोन आठवड्यांत ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात