AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं एक ठिकाण जिथे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात

लग्न सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. लग्नानंतर मुली सुखी संसाराचं स्वप्न पाहत असतात. अशात भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे एकच मुलीसोबत घरातील सर्व भाऊ लग्न करतात. त्यामागे कारण देखील फार वेगळं आहे... जे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल...

भारतातील असं एक ठिकाण जिथे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात
Polyandrous Marriage
| Updated on: Feb 16, 2026 | 9:39 AM
Share

लग्न ठरत असताना किंवा लग्न ठरल्यानंतर मुली अनेक स्वप्न रंगवतात असतात. लग्न म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. कारण त्या एका दिवसानंतर सर्वकाही बदलून जातं…पण भारतात असं एक ठिकाण आहे, जिथे घरातील सर्व भावांसोबत एक मुलगी लग्न करते. भारतातील विवाह पद्धतींची विविधता जगभरात ज्ञात आहे. अशीच एक अनोखी आणि फार कमी लोकांना माहिती नसलेली परंपरा सध्या सर्वत्र चर्चेत आहे, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. विशेष म्हणजे हे लग्न पूर्णपणे परस्पर संमतीने केले जाते आणि स्थानिक रीतिरिवाजांनुसार ते वैध मानले जाते. असे लग्न भारतात कुठे आणि का होतात… जाणून घ्या…

सर्व भावांनी एकाच मुलीशी लग्न करण्याची ही परंपरा प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात दिसून येते. काही काळापूर्वी हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील ट्रान्स गिरी भागात दोन भावांनी एकाच मुलीशी लग्न केले. पारंपारिक विधींनुसार हा विवाह सोहळा पार पडला आणि त्यांच्या विवाहासाठी सर्व सहभागी लोकांची स्पष्ट संमती होती.

हिमाचल प्रदेशातील हट्टा जमातीच्या काही भागात अजूनही या प्रकारची विवाह प्रथा पाळली जाते. स्थानिक भाषेत या विवाहांना “जजदा लग्न” असे देखील म्हणतात. सिरमौर जिल्ह्याव्यतिरिक्त, अशी परंपरा ऐतिहासिकदृष्ट्या जौनसर-बावर (उत्तराखंड) आणि किन्नौर प्रदेशात देखील दिसून येते.

या परंपरेमागील मुख्य कारण म्हणजे कुटुंबाची जमीन आणि मालमत्तेचे विभाजन टाळणे असे मानले जाते. डोंगराळ भागात लागवडीयोग्य जमीन मर्यादित असल्याने, मालमत्ता एकाकडेच टिकवून ठेवण्यासाठी असे विवाह केले जात होते. लग्नानंतर, संपूर्ण कुटुंब संयुक्तपणे मुलीची जबाबदारी स्वीकारते.

या विवाह पद्धतीत, मोठा भाऊ हा सहसा मुलाचा कायदेशीर पिता मानला जातो. परिसरातील वडीलधारी आणि समाजातील ज्येष्ठ सदस्यांच्या मते, हे सर्व संबंध परंपरा आणि परस्पर संमतीच्या आधारावर स्थापित केले जातात.

पण, 1970 आणि 1980 च्या दशकापासून अशा विवाहांची प्रथा लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. आधुनिक शिक्षण, कायदेशीर जागरूकता आणि सामाजिक बदलांमुळे असे विवाह आता दुर्मिळ झाले आहेत. आजकाल, या प्रकारच्या लग्नांचे सार्वजनिकरित्या प्रसारण क्वचितच केले जाते आणि त्यांची संख्या देखील अत्यंत मर्यादित आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.