AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Chatrapati Sambhaji Maharaj Statue : रातोरात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, पोलिसांकडून कारवाई, सांगलीत काय घडलं ?

सांगलीत राम मंदिर चौकात शिवभक्तांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा उभारल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी विनंती करून पुतळा काढण्यास सांगितले. प्रशासनाने स्मारकासाठी दुसरी जागा नियोजित केली असतानाही कार्यकर्त्यांनी चौकातच पुतळ्याची मागणी केली. अखेर समन्वय साधून पुतळा हटवण्यात आला, मात्र कार्यकर्त्यांनी चौकातच पुतळा बसवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Sangli Chatrapati Sambhaji Maharaj Statue : रातोरात बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, पोलिसांकडून कारवाई, सांगलीत काय घडलं ?
| Updated on: Apr 04, 2026 | 8:46 AM
Share

सांगली शहरात शिवभक्तांनी, काही कार्यकर्त्यांनी राम मंदिर चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता. शहरातील राममंदिर चौकातील आयलँडच्या समोर असणाऱ्या भगव्या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. परवनागी नसताना त्यांनी हा पुतळा उभारल्याचे निदर्शनास आलं. मात्र त्यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

पुतळा उभारल्यानंतर तेथे विश्रामबाग पोलीस दाखल झाले,अनधिकृतपणे पुतळा बसवू नका, पुतळा काढून घ्या,अशी विनंती पोलिसांनी केली. या घटनेमुळे , वाढता तणाव पाहून या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुतळ्याच्या समोर छ.संभाजी महाराज प्रेमी कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. अखेर समन्वयाने राम मंदिर चौकात बसवलेला पुतळा बाजूला काढण्यात आला.

नक्की काय घडलं ?

महापालिकेकडून सांगली शहरातील जुन्या अग्निशमन कार्यालयाशेजारी छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागा नियोजित करण्यात आली आहे. मात्र या जागेऐवजी राममंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आणि त्यांनी रातोरात तिथेच पुतळा उभा केला.राममंदिर चौकातील आयलँडच्या समोर असणाऱ्या भगव्या ध्वजाच्या खाली हा पुतळा उभारण्यात आला खरा, मात्र त्यासाठी आवश्यक ती परवानगी नव्हती.

पुतळा बसवल्याचे पोलिसांचा निदर्शनास आलं आणि त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. संबंधित पुतळा विना परवानगी उभारण्यात आल्याचे स्पष्ट झालं. महापालिकेतील एका उद्यानात महाराजांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती. यापूर्वी आम्ही अनेक वेळा निवेदन देऊनही पुतळ्याला परवानगी योग्य ठिकाणी मिळाली नाही. पुतळा कुणीही बसवावा पण चौकात बसवावा अशी मागणी शिवभक्तांनी यावेळी केली.

महापालिकेने दिलेल्या त्रिकोणी बागेचा पर्याय नाकारत सांगली शहरातील कोणत्याही चौकात पुतळ्याची उभारणी करावी, अशी शंभू प्रेमींनी मागणी केली. त्यानुसार महापालिका अधिकारी, पोलीस आणि पुतळ्याची उभारणी केलेले शंभू प्रेमी यांच्यामध्ये शिष्टाई करण्यात आली. तिघांची एक बैठक घेऊन सांगली शहरातील कोणत्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसण्यासाठी परवानगी देण्यात येईल यावर चर्चा करण्यात येईल.

असे आश्वासन दिल्यानंतर अखेर राम मंदिर चौकात बसवण्यात आलेला पुतळा अखेर सदर जागेवरून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बाजूला काढण्यात आला. यावेळी शिवभक्त आणि मोठी गर्दी केली होती, तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, ‘कोणत्याही परिस्थितीत पुतळा हा चौकातच बसला पाहिजे अन्यथा मी पुन्हा पुतळा उभा करणारच अन्यथा मी आत्मदहन करेन’ असा इशारा शिवतेज सावंत यांनी दिला आहे.  परंतु या घटनेच्या पार्श्वभूमीवर मात्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सांगली शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Follow Us
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...