AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून वाढणार या 3 राशींच्या अडचणी; चंद्र-केतूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग

Chandra Ketu Grahan Yog: 30 नोव्हेंबर 2026 रोजी चंद्र आणि केतूच्या युतीमुळे सिंह राशीत ग्रहणयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रातील मान्यतांनुसार, या ग्रहणयोगाचा परिणाम 3 राशीच्या लोकांवर होऊ शकतो.

उद्यापासून वाढणार या 3 राशींच्या अडचणी; चंद्र-केतूच्या युतीमुळे तयार होणार ग्रहण योग
Chandra Ketu Grahan YogImage Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 6:15 AM
Share

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या युतीला विशेष महत्त्व दिले जाते. दोन ग्रह एकाच राशीत आल्यावर त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो, असे मानले जाते. ३० नोव्हेंबर रोजी चंद्र आणि केतू यांची सिंह राशीत युती होणार आहे. यामुळे ग्रहण योग तयार होणार असल्याचे ज्योतिषीय गणनेत सांगितले जात आहे. या योगाचा प्रभाव सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. त्यामुळे कामकाजापासून कौटुंबिक आयुष्यापर्यंत काही बाबतीत या राशींनी काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घेऊया या तीन राशींवर काय परिणाम होऊ शकतो.

चंद्र-केतू ग्रहणयोग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि केतू हे दोन्ही ग्रह एकाच राशीत किंवा भावात असतील, तेव्हा चंद्र-केतू ग्रहणयोग किंवा ग्रहणदोष तयार होतो. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना आणि मानसिक शांततेचा कारक मानले जाते. तर केतूचा संबंध वैराग्य, अलिप्तता आणि संभ्रमाशी जोडला जातो. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मनात द्विधा मनःस्थिती, अस्वस्थता आणि भावनिक चढ-उतार वाढू शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील या योगाचा प्रभाव ग्रहांची स्थिती, भाव, लग्न आणि अंश यांवर अवलंबून असतो.

सिंह

चंद्र आणि केतूची युती सिंह राशीतच होणार असल्याने या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. सहकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून राग व्यक्त करणे टाळा. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. कोणत्याही वादात पडण्याऐवजी संयमाने परिस्थिती हाताळणे योग्य ठरेल. उपाय: नियमित भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी शिवलिंगावर जल, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते.

धनु

कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक तणाव आणि थकवा जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या डेडलाइनकडे विशेष लक्ष द्यावे. कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचून घ्यावे. उपाय: मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. बजरंगबलींना चोळा अर्पण करणेही शुभ मानले जाते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना या काळात करिअर आणि कौटुंबिक आयुष्य यांचा समतोल राखताना अडचणी येऊ शकतात. कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबीयांना पुरेसा वेळ देणे कठीण होऊ शकते. घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. आर्थिक आणि कौटुंबिक बाबींमध्ये विचारपूर्वक पावले उचलणे योग्य ठरेल. उपाय: शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे आणि भगवान शंकराच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे मनाला शांती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

चंद्र-केतू ग्रहणदोषाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय

ज्योतिषीय मान्यतेनुसार, ग्रहण योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध, पाणी, गंगाजल आणि बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी. तसेच ‘ॐ सोमाय नमः’ आणि ‘ॐ केतवे नमः’ या मंत्रांचा जप करावा. याशिवाय भगवान गणेशाची आराधना, हनुमान चालीसाचे पठण, कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे आणि पक्ष्यांना दाणे टाकणे शुभ मानले जाते. गरजू व्यक्तींना अन्न, दूध, तीळ किंवा चादरींचे दान करणेही लाभदायक मानले जाते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!