AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी 6 कोटी, 10 कोटी खर्च केले तरी..; धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली..

जळगावची ही मराठी अभिनेत्री साऊथ सुपरस्टार धनुषशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अखेर तिने मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा आहेत.

मी 6 कोटी, 10 कोटी खर्च केले तरी..; धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली..
Mrunal ThakurImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 16, 2026 | 9:38 AM
Share

अभिनेत्री मृणाल ठाकूरने टेलिव्हिजनपासून बॉलिवूड आणि त्यानंतर टॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास केला आहे. दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मृणाल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टार धनुषसोबत तिचं नाव जोडलं जात आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या दोघांचा एक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धनुष आणि मृणाल दाक्षिणात्य वर-वधूच्या रुपात दिसत आहेत. परंतु हा एआय जनरेटेड फोटो असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं. या सर्व चर्चांच्या आणि व्हायरल फोटोच्या पार्श्वभूमीवर आता मृणाल ठाकूरने मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या अफवा पसरवून फुकट प्रसिद्धी दिल्याबद्दल तिने आभार मानले आहेत.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मृणाल या अफवांवर हसली आणि म्हणाली, “त्यांच्या हिशोबाने तर लग्न होत आहे. आतापर्यंत माझी कोणतीच पीआर (प्रसिद्धी) टीम नव्हती. आता मला टीम नियुक्त करावी लागली, कारण यावेळी माझ्या घराचा पत्ताच सार्वजनिक झाला होता. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मला टीम ठेवावी लागली. तरी मला एक गोष्ट समजली आहे की जरी मी 3 कोटी, 6 कोटी, 10 कोटी जरी खर्च केले, तरी मला इतकी प्रसिद्धी कधीच मिळणार नाही. त्यामुळे ज्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे.”

मृणाल ठाकूर आणि धनुषच्या रिलेशनशिपच्या अफवा गेल्या वर्षापासून सुरू झाल्या होत्या. मृणाल धनुषच्या चित्रपटाच्या रॅप-अप पार्टीत सहभागी झाली होती. त्यानंतर ‘सन ऑफ सरदार 2’च्या प्रीमिअमलाही मृणाल आणि धनुष एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. यानंतर चर्चांना आणखी उधाण आलं. ‘पीटीआय’शी बोलताना मृणालने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना बरीच उत्सुकता असल्याचं म्हटलं होतं. भविष्यात मी लग्न नक्कीच करेन, परंतु मला घाई नाही. योग्य वेळ आली की मी स्वत:च घोषणा करेन. लग्नाबद्दल लोकांचा दृष्टीकोन काळानुसार बदलला आहे, असंही ती म्हणाली होती.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात