तब्बल 8 महिन्यांनंतर पुण्यात गिर्यारोहणाला परवानगी, मात्र अटीशर्थी लागू!

| Updated on: Nov 02, 2020 | 9:41 AM

अनलॉकची घोषणा केल्यानंतर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने हॉटेल्स, बार, ग्रंथालयं, उद्याने यांसारख्या अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गिर्यारोहणाला परवानगी दिली आहे.

तब्बल 8 महिन्यांनंतर पुण्यात गिर्यारोहणाला परवानगी, मात्र अटीशर्थी लागू!
Follow us on

पुणे: अनलॉकिंगला सुरुवात झाल्यानंतर हळू-हळू अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर तब्बल 8 महिन्यानंतर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत. मात्र, त्यासाठी काही नियमही घालून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. (Climbing allowed in Pune after 8 months)

अनलॉकची घोषणा केल्यानंतर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने हॉटेल्स, बार, ग्रंथालयं, उद्याने यांसारख्या अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्याजवळच्या गड-किल्ल्यांवरील गिर्यारोहणाला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी काही नियमही घालून देण्यात आले आहेत.

गिर्यारोहणासाठी घालून दिलेले नियम

  • ट्रेकिंगसाठी जाताना एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही
  • 10 वर्षाच्या आतील लहान मुलं आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार नाही
  • स्थानिकांच्या घरात भोजन किंवा मुक्काम करता येणार नाही
  • नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार

पुण्यातील उद्याने सुरु, गर्दी फक्त तरुणांची!

लॉकडाऊनमुळे गेली 7 महिने बंद असलेली पुण्यातील उद्यानंही सुरु झाली आहेत. पण या उद्यानांमध्ये फक्त तरुणाईच पाहायला मिळते आहे. कारण, उद्यानात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पुण्यातील बागांमध्ये सध्या गप्पांचे फड रंगताना दिसत नाहीत. तर जी काही गर्दी पाहायला मिळत आहे ती फक्त तरुणाईचीच!

पुण्यात बहुतांश व्यापार आणि व्यवहार सुरुळीत झाले आहेत. पण बागा आणि उद्यानं अद्याप बंदच होती. पुणेकरांची वाढती मागणी लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारानंतर रविवारपासून उद्यानं उघडण्यात आली आहेत. रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास उद्यानं उघडली जात आहेत. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात नो एन्ट्री करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर उद्यानं पुन्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी 

पुण्यातील 200 पेक्षा अधिक उद्यानं 4 महिन्यांपासून बंद, पालिका उत्पन्नाला कोट्यावधींचा फटका

Climbing allowed in Pune after 8 months