पुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी

पुणे शहरातील उद्याने येत्या 1 नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील उद्याने अखेर खुली होणार, 1 नोव्हेंबरपासून परवानगी

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली पुणे शहरातील उद्याने येत्या 1 नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचा आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. (Pune Garden re open After 7 Month)

कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात येत असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरु करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक असल्याचं महापौर मोहोळ म्हणाले.

केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घ्यावी. काळजी उत्तम प्रकारे घेतल्यास आपल्याला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते, असं मोहोळ म्हणाले.

जून महिन्यात राज्य सरकारने लॉकडाऊन 5 च्या नियमावलीत सूट दिली असताना पुण्यातील 199 पैकी 150 उद्याने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र पहिल्या काही दिवसांतच नागरिकांनी घालून दिलेले नियम न पाळल्याने महापालिकेने उद्याने पुन्हा एकदा बंद करावी लागली होती.

(Pune Garden re open After 7 Month)

संबंधित बातम्या

पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *