T20I World Cup 2024 : नेपाळची वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर, सिक्सर किंगचा समावेश, रोहित कॅप्टन
Nepal T20i World Cup Squad 2024 : वर्ल्ड कपसाठी नेपाळ क्रिकेटने आपली टीम जाहीर केली आहे. नेपाळच्या मुख्य संघात सिक्सर किंग फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचं आयोजन हे यूएएस आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजला वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेत एकूम 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांना 5-5 नुसार 4 संघात विभागलं आहे. स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 29 जूनला अंतिम सामना पार पडणार आहे. यजमान अमेरिका, कॅनडा, नेपाळ आणि युगांडा हे संघ पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणर आहे. वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर करण्याची ही 1 मे अखेरची तारीख आहे. त्यानुसार प्रत्येक टीम आपल्या वर्ल्ड कप पथकाची घोषणा करत आहे. नेपाळनेही आपला संघ जाहीर केला आहे.
सिक्सर किंगचा समावेश
ऑलराउंडर रोहित पौडेल नेपाळ टीमचं टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड कप टीममध्ये नेपाळसाठी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकणाऱ्या फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. ऑलराउंडर दीपेंद्र सिंह आयरी याचा समावेश करण्यात आला आहे. आयरीने एप्रिल महिन्यात कतार विरुद्ध एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली होती.
नेपाळ डी ग्रुपमध्ये
नेपाळ क्रिकेट टीम वर्ल्ड कपच्या डी ग्रुपमध्ये आहे. नेपाळसह या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. नेपाळ वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे.
25 मेपर्यंत बदलाची परवानगी
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये प्रत्येक क्रिकेट संघाला 25 मे पर्यंत बदल करता येणार आहे. निवड समितीला 25 मे पर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय टीममध्ये बदल करता येईल. मात्र त्यानंतर बदल करायचा झाल्यास आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी आवश्यक असणार आहे.
नेपाळची टी 20 वर्ल्ड कपसाठी घोषणा
Nepal squad announced for the ICC Men’s #T20WorldCup 2024.
More 👇https://t.co/0xUp0dK3bK
— ICC (@ICC) May 1, 2024
टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी नेपाळ टीम : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुरटेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल आणि कमल सिंग आयरी.
