Varun Sardesai : ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत हिणवलं; वाद पेटणार?
राज ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीची घोषणा केली आहे. यावर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईसह इतर महानगरपालिकांमधील जागावाटप लवकरच निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेला उत्तर देताना सरदेसाई म्हणाले, अमित साटम एक बाहुली आहेत. प्रत्येकाने आपली पात्रता ओळखावी.
मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेची युती अखेर राज ठाकरे यांनी स्वतः घोषित केली आहे. या घोषणेनंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरदेसाई म्हणाले की, महत्त्वाच्या घोषणा नेत्यांनीच करायच्या असतात आणि राज ठाकरे यांनी आजचा योग्य दिवस साधला. ही घोषणा मराठी माणसाला आणि मुंबईकरांना सुखावणारी असून, उमेदवार मनसेचा असो किंवा शिवसेनेचा, तो ठाकरेंचा आहे हे पाहून काम केले जाईल. जागावाटपाबाबत बोलताना सरदेसाईंनी सांगितले की, मुंबईचे जागावाटप निश्चित झाले आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक आणि पुण्यातही येत्या काही दिवसांत एकमत होऊन युतीची घोषणा होईल. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट करत केलेल्या टीकेला सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिले. अमित साटम एक बाहुली आहेत. ते जर खरंच सक्षम असते, तर त्यांच्या डोक्यावर आशिष शेलार नसते, असे ते म्हणाले. प्रत्येकाने आपली पात्रता ओळखून बोलावे, असा सल्लाही सरदेसाईंनी साटम यांना दिला.
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा

