IAS अधिकाऱ्यासोबत असं घडतंय तर सामान्य माणसाचं काय? थेट अटकेची धमकी आणि…
चक्क IAS अधिकाऱ्यासोबत धक्कादायक घडली आहे. मोठं नुकसान झाल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला... घडना घडल्यानंतर ते म्हणाले, IAS अधिकाऱ्यासोबत असं घडतंय तर सामान्य माणसाचं काय? काय आहे संपूर्ण प्रकरण

गुन्हेगारीच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. एकीकडे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे तर, दुसरीकडे, सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. आता देखील एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये सायबर फसवणुकीचा एक मोठा प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब सरकारचे माजी सचिव, फिरोजपूर आणि फरीदकोटचे माजी उपायुक्त हरजिंदर चहल यांना सायबर फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे फसवणूक करणाऱ्यांनी धमक्या आणि भीती दाखवून त्यांची ऑनलाइन अंदाजे 76 लाख रुपयांची फसवणूक केली. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तब्बल 76 लाखांची फसवणूक झाल्यामुळे अमरजीत सिंग चहल यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
हरजिंदर सिंग चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 5 सप्टेंबर 2024 रोजी एक व्हॉट्सअॅप कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख अजित कुमार बन्सल अशी करून दिली, जो मुंबई सायबर क्राइम सेलमध्ये निरीक्षक आहे. आरोपीने सांगितलं की, मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध समन्स जारी केलं आहेत.
समन्स जारी केलं असं सांगितल्यानंतर चहल घाबरले.. फोनवर आरोपीने सांगितलं, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स जारी केलं आहे. जर त्यांनी चौकशीत सहकार्य केलं नाही तर त्यांना अटक केली जाऊ शकते. भीतीपोटी, हरजिंदर सिंग यांनी फसवणूक करणाऱ्याशी सहमती दर्शवली आणि आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केलं.
आरोपीने हरजिंदर सिंग यांना विश्वात घेतलं आणि सांगितलं, तपास पूर्ण झाल्यानंतर पूर्ण रक्कम पुन्हा देण्यात येईल… त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरजिंदर सिंग यांनी आरोपीला फोन केला तेव्हा, त्याचा फोन बंद असल्याचं कळंल. अखेर हरजिंदर सिंग यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे.
यानंतर हरजिंदर सिंग यांनी अमृतसर पोलिस आयुक्तांना या प्रकरणाची माहिती दिली, परंतु सुरुवातीला प्रकरण गांभीर्याने घेतलं गेलं नाही. त्यानंतर त्यांनी चंदीगडमधील एडीजीपी व्हिजिलन्स यांना ही बाब कळवली. तपासादरम्यान, आसाममध्ये दोन संशयितांना अटक करण्यात आली, परंतु अद्याप पूर्ण रक्कम परत मिळालेली नाही.
संबंधित प्रकरणी माजी आयएएस अधिकारी हरजिंदर सिंग चहल म्हणाले, जर आयएएस अधिकाऱ्यासोबत अशी फसवणूक होऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत…
