AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनामुळे होणारी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध की..उद्धव ठाकरेंची भूमिका काय?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज झालाय. महाराष्ट्रात जे चाललय ते पटतय का? असं विचारण्यात आलय. "मग, राज ठाकरे काय चुकीचं बोलतायत. महाराष्ट्रात देशात जे चाललय ते पटतय का?"

अजित पवार यांच्या निधनामुळे होणारी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध की..उद्धव ठाकरेंची भूमिका काय?
Uddhav Thackeray
| Updated on: Mar 16, 2026 | 11:12 AM
Share

“आम्ही सत्य सांगितल्याने त्यांना असं वाटतय आम्ही मोदीची बदनामी करतोय म्हणून. आम्ही अर्बन नक्षलवादी आहोत. हॉटेल इतर उद्योग बंद पडतायत. रोजंदारीवर असलेला कामगार गावाकडे जायला निघाला आहे, हे सांगणं म्हणजे आम्ही अर्बन नक्षली” असं संजय राऊत म्हणाले. “दीपक पवार केंद्र सरकारच्या हिंदी भाषा सक्ती विरुद्ध महाराष्ट्रात आवाज उठवत आहेत. मराठी भाषा सक्तीची असावी, महाराष्ट्रात मुंबईत सक्तीची असावी, मराठी शाळा टिकाव्यात यासाठी दीपक पवारांसारखे प्राध्यापक, संशोधक भूमिका मांडत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

“सिनेटमधील भाजपचे लोक त्यांना अर्बन नक्षली ठरवत असतील तर ते महाराष्ट्राच, मराठी माणसाचं दुर्देव आहे. ही पिल्लावळ 50 वर्षापूर्वी जन्माला आली असती तर हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही नक्षलवादी ठरवलं असतं. यांनी महाराष्ट्राची, देशाची वाट लावलेली आहे. दीपक पवार मराठी भाषा, मराठी संस्था टिकाव्यात यासाठी काम करतायत ते आमचे सहकारी आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

हा संघ छाप नक्षलवाद भयंकर

“मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक आम्ही जिंकली. एशियाटिक सोसायटीची निवडणूक दबाव आणून रद्द करायला लावली. कारण त्यांचा पराभव होणार होता. अमराठी बिल्डर जे माजले आहेत, त्यांच्या ताब्यात साहित्य संघ, एशियाटिक लायब्ररी, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हवं आहे. कारण त्यांना तिथे टॉवर उभे करायचे आहेत. त्यांना मराठी विषयी अजिबात प्रेम नाही. हा संघ छाप नक्षलवाद भयंकर आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी टिका केली.

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या टीझरवर काय बोलले?

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर रिलीज झालाय. महाराष्ट्रात जे चाललय ते पटतय का? असं विचारण्यात आलय. “मग, राज ठाकरे काय चुकीचं बोलतायत. महाराष्ट्रात देशात जे चाललय ते पटतय का?. प्रत्येक राष्ट्रभक्त, महाराष्ट्र प्रेमी जनतेला पडलेला प्रश्न आहे. तुम्हा-आम्हा सर्वांना हा प्रश्न पडला पाहिजे. ज्यांना कोणाला हा प्रश्न पडत नसेल त्यांनी स्वत:ला मराठी, भारतप्रेमी समजू नये” असं संजय राऊत म्हणाले.

बारामती पोटनिवडणुकीवर भूमिका काय?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती आणि राहुरीची निवडणूक लागलीय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका काय? “उद्धव ठाकरे आज विधिमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतल्या पक्षांशी चर्चा होईल. त्यानंतर तो एकत्रित निर्णय घेतला जाईल. जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात निवडणूक बिनविरोध व्हावी, त्यातला विरोध शब्द महत्वाचा आहे. अजित पवार यांच्याविषयी सदभाव,सहानुभूती त्यांच्या कुटुंबाविषयी आहे. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता, तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्ष नेत्याचं काय?” असा सवाल राऊत यांनी विचारला.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग