AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपी अनुजच्या पार्थिवावर इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार, CID कडून मृत्यूचा तपास सुरु

अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने जेलमध्ये स्वत:ला संपवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अनुजच्या वकिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर आता त्याच्या मृत्यू प्रकरणी सीआयडीकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपी अनुजच्या पार्थिवावर इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार, CID कडून मृत्यूचा तपास सुरु
सलमान खान गोळीबार प्रकरण : आरोपी अनुजच्या पार्थिवावर इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार
| Edited By: | Updated on: May 01, 2024 | 9:16 PM
Share

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण येताना दिसत आहे. कारण या प्रकरणातील एका आरोपीने जेलमध्ये स्वत:ला संपवलं आहे. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव अनुज थापन असं होतं. अनुज थापन याच्यावर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप होता. पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने तपास करत गोळीबार करणाऱ्या आरोपींना शोधून काढलं होतं. त्यानंतर अनुज थापन याला अटक करण्यात आली होती. अनुजच्या मृत्यूवर आता त्याच्या वकिलांनी गंभीर आरोप केला आहे. अनुज थापन याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आता एक नवं गूढ निर्माण झालं आहे.

अनुज थापन याचे वकील अमित मिश्रा आणि वकील विकी शर्मा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीसांनी बळाचा वापर केल्याने अनुजचा मृत्यू झाला, असा आरोप वकिलांनी केला आहे. अनुज थापन याचं पोस्टमार्टेम इन कॅमेरा व्हावं अशी तातडीची मागणी वकिलांनी केली. तसेच या प्रकरणाता तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी अनुजच्या वकिलांनी केला आहे. अनुजचे वकील या प्रकरणी उद्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

सीआयडीकडून तपासाला सुरुवात

दुसरीकडे अनुज थापन याने स्वत:चं जीवन संपवल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. अनुजच्या मृत्यूनंतर सीआयडीचं पथक मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झालं आहे. अनुज थापन याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी आता सीआयडी करणार आहेत. ज्या लॉकअपमध्ये अनुज थापनने स्वत:ला संपवलं, तिथे सीआयडी पथकने पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे.

इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार

दरम्यान, मृत अनुज थापनचे पार्थिव जे जे हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं आहे. याआधी अनुजला जी टी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. पण इथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. यानंतर आता पोलीस बंदोबस्तात अनुज थापन याचं पार्थिव जे जे हॉस्पिटलच्या दिशेला रवाना करण्यात आलं आहे. अनुजच्या पार्थिवावर जे जे हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे. अनुजचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्याने इन कॅमेरा पोस्टमार्टेम होणार आहे. विशेष म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पोस्टमार्टेम होणार आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.