काँग्रेसची 26 नावांवर चर्चा, ही नावं जवळपास निश्चित

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात राज्यातील 26 नावांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर उमेदवार कोण असावेत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. काही नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेसने या बैठकीत 26 लोकसभा जागांचा आढावा घेतला, त्यात काही उमेदवार […]

काँग्रेसची 26 नावांवर चर्चा, ही नावं जवळपास निश्चित
Follow us on

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मंगळवारी बैठक झाली. यात राज्यातील 26 नावांवर चर्चा झाली. प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या प्रस्तावावर उमेदवार कोण असावेत यावर चर्चा करण्यात आली, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. काही नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहेत.

काँग्रेसने या बैठकीत 26 लोकसभा जागांचा आढावा घेतला, त्यात काही उमेदवार जवळपास निश्चित असून दिल्लीत नावे पाठवणार आहेत.

सोलापूर – सुशीलकुमार शिंदे यांचं नाव जिल्हा कमिटीने दिलंय.

यवतमाळ वाशिम – माणिकराव ठाकरे यांच्या नावाची शिफारस

वर्धा – चारूलत्ता टोंकस

दक्षिण मुंबई – मिलींद देवरा

काही मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीने जास्त नावं दिली असून त्याचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.

नागपूर – विलास मुत्तेमवार किंवा नाना पटोले

चंद्रपूर – देवतळे किंवा आशिष देशमुख

शिर्डी – भाऊसाहेब कांबळे, राजू वाघमारे

नंदुरबार – के सी पाडवी

नागपूर – गुडदे पाटील यांच्या नावावर चर्चा

(प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील आढावा पाहण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा)

राष्ट्रवादीने नगरची जागा आम्हाला द्यावी : अशोक चव्हाण

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात आघाडीचं सूत्र जवळपास निश्चित झालं असलं तरी अहमदनगरसाठी घोडं अडलेलं दिसतंय. नगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आमची परिस्थिती चांगली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रवादीकडूनही या जागेसाठी रस्सीखेच चालूच आहे.

नगरसाठी रस्सीखेच कशामुळे?

आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र या जागेवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे काँग्रेसकडून आग्रही आहेत. जागा काँग्रेसला सोडली नाहीतरी लढण्याचा निर्णय सुजय विखेंनी घेतलाय. वेळप्रसंगी काँग्रेस सोडण्याचं नुकताच त्यांना ईशारा दिलाय. सुजय विखेंची भाजपाकडूनही चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा आहेत. काहीही असले तरी सुजय यांनी प्रत्येक तालुक्यात झेडपी गटात वैद्यकीय शिबीरं घेतली आहेत. त्यामुळे सुजय विखेंनी जनसंपर्क वाढवला असून तयारी सुरु केली आहे.