दिल्लीत भीषण वाहतूक कोंडी, दोन तास ट्रॅफिक एकाच जागी रखडून

| Updated on: Dec 19, 2019 | 4:06 PM

दिल्ली शहरात गुरुवारी दाखल होणारी वाहनं रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांवर बॅरिकेट्स लावण्याची वेळ आली.

दिल्लीत भीषण वाहतूक कोंडी, दोन तास ट्रॅफिक एकाच जागी रखडून
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीकरांची गुरुवारची सकाळ भीषण वाहतूक कोंडीने झाली. ‘भीषण’ हा शब्द दिल्ली-गुरुग्राम सीमेवरील वाहतूक कोंडीचं वर्णन (Delhi Gurugram Traffic Jam) करण्यासाठी अतिशय योग्य ठरणारा आहे. कारण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले दिल्लीकर दोन तासात अक्षरशः एक किलोमीटरही पुढे सरकलेले नव्हते.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. राजधानीतील विविध भागांमध्ये मोर्चे आणि निदर्शनं झाल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गुरुवारी शहरात दाखल होणारी वाहनं रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांवर बॅरिकेट्स लावण्याची वेळ आली.

पोलिसांच्या आदेशानुसार दिल्ली मेट्रोने आज सकाळी 14 मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारं बंद केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर वाहतूक कोंडी झाल्यामुळे 16 विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत. तर ‘इंडिगो’ विमान कंपनीने 19 फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. क्रू मेंबर्स शहरातील वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: पत्नीवर मित्रांकरवी बलात्कार, वाईफ स्वॅपिंग प्रकरणात मुंबईत उद्योगपतीला अटक