पत्नीवर मित्रांकरवी बलात्कार, वाईफ स्वॅपिंग प्रकरणात मुंबईत उद्योगपतीला अटक

वाईफ स्वॅपिंगप्रकरणात मुंबईतील उद्योगपतीला अटक (Police arrested Businessman in Wife Swapping)  करण्यात आली आहे.

पत्नीवर मित्रांकरवी बलात्कार, वाईफ स्वॅपिंग प्रकरणात मुंबईत उद्योगपतीला अटक

मुंबई : वाईफ स्वॅपिंगप्रकरणात मुंबईतील उद्योगपतीला अटक (Police arrested Businessman in Wife Swapping)  करण्यात आली आहे. वाईफ स्वॅपिंग प्रकरणात पतीने त्याच्या मित्रांकडून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पत्नीने केली होती. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तसेच पोलीस (Police arrested Businessman in Wife Swapping) अधिक चौकशी करत आहेत.

आरोपी पतीने आपल्या तीन मित्रांसोबत 15 जून 2017 रोजी वाईफ स्वॅपिंग प्रकरणात पत्नीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच हे जर कुणाला सांगितले तर तिला ठार मारण्याची धमकीही दिली जात होती.

आरोपी पती आणि त्याचे मित्र पत्नींची अदलाबदल करायचे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे आरोपीचे वडीलही पती सांगेल तसा वाग, असं पीडितेला सांगायचे. या सर्व प्रकारामुळे पीडितेला धक्का बसला होता.

आरोपीला दोन मुलं आहेत. पत्नीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काल (18 डिसेंबर) आरोपी पतीला अटक केली आहे. हे प्रकरण कोर्टात सुरु असून कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *