AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा जगाला झोप उडवणारा इशारा, थेट जगच संकटात, मोठा हाहाकार…

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगात तणाव निर्माण झाला. यादरम्यानच इराणकडून आता जगाची झोप उडवणारा इशारा देण्यात आला. अजून आपल्याकडे अनेक पत्ते शिल्लक आहेत, असे स्पष्ट इराणकडून सांगण्यात आले. जर इराणकडून दुसरा निर्णय घेण्यात आला तर संपूर्ण युरोप संकटात येऊ शकतो.

इराणचा जगाला झोप उडवणारा इशारा, थेट जगच संकटात, मोठा हाहाकार...
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 12, 2026 | 12:57 PM
Share

अमेरिका आणि इराणच्या युद्धात जग तणावात आहे. जगावर मोठं संकट आले. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून इतरही देशांचे तेल जहाज उडवले जात आहेत. गॅस आणि तेलाचे संकट सर्वच देशांवर आहे. इराणवर हल्ला करून अमेरिकेलाही फटका बसलाच. इराण आणि अमेरिका युद्ध आता हळूहळू समुद्राकडे पोहोचले आहे. इराणकडून अमेरिकेवर दबाव आणण्याकरिता महत्वाचा समुद्री मार्गही बंद करण्यात आला. इराण हा होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा घेत आहे. ज्यामुळे याचा आता थेट तेल आणि वायूच्या किंमती वाढल्या असून वाहतूक ठप्प आहे. तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. इराण अजून मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून जर इराणकडून हा निर्णय घेण्यातच आला तर जगाच्या तोंडचे पाणी पळेल. एका वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट संकेत दिले की, अमेरिकेने धोरणात्मक चूक केली तर अराण सागरी ऑपरेशन्स दुसऱ्या महत्वाच्या जलमार्गांकडे वळवेल.

इराणच्या या इशाऱ्यांने जगाची झोप उडवली. इराणी अधिकाऱ्याने अल जझीरासोबत बोलताना म्हटले की, अमेरिकेने चुकीचे पाऊल उचलले तर होर्मुजच्या सामुद्रधुनीत दुसरा संघर्ष निर्माण होऊ शकतो. लवकरच एका मोठ्या प्रादेशिक युद्धात रूपांतरित होऊ शकते आणि इराणकडे अजूनही बरेच पत्ते शिल्लक आहेत. अजूनही होर्मुजचा सागरीमार्ग बंद पडलेला आहे.

बाब अल-मंडेबला इराणचे दुसरे होर्मुझ मानले जाते. इराणकडून जर तो समुद्री मार्ग बंद करण्यात आला तर जगाच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. अंदाजे 26 किलोमीटर रुंदीचा हा जलमार्ग येमेन आणि जिबूती दरम्यान आहे. लाल समुद्राच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर आहे. जर तो बंद झाला तर आखाती तेल उत्पादक देशांना तेल निर्यात करण्यासाठीचा शेवटाचाही मार्ग बंद होऊ शकतो.

आता होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्याने बाब अल-मंदेब आखाती देशांसाठी आणखी महत्त्वाचा बनले आहे. सौदी अरेबिया सध्या लाल समुद्रातील बंदरे आणि पूर्व-पश्चिम पाइपलाइनद्वारे काही तेल निर्यात सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुतेक तेल आशियाई बाजारपेठांसाठी निर्यात केले जाते आणि येमेनमधून जाते. जर खरोखरच इराणकडून हा समुद्रीमार्ग बंद करण्यात आला तर मोठी खळबळ उडेल.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार