AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : डोळे असूनही आंधळे असतात असे लोक, स्वत:च्या हाताने आयुष्याचं वाटोळं करतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की काही लोक हे असे असतात, जे डोळे असून देखील आंधळे असतात, असे लोक आपल्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात.

Chanakya Niti : डोळे असूनही आंधळे असतात असे लोक, स्वत:च्या हाताने आयुष्याचं वाटोळं करतात
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 7:42 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना मार्ग दाखवण्याचं काम करतात. चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की काही लोकं डोळे असूनही आंधळे असतात. असे लोक आपल्याच हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. अशा लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव असते, सत्य समोर दिसत असतं, मात्र तरी देखील ते कधीही सत्य स्वीकारण्याची तयारी दाखवत नाहीत, कायम कल्पनेमध्ये जगतात. वेळीच सत्य न स्विकारल्यामुळे अशा लोकांचं प्रचंड नुकसान होतं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारे – चाणक्य म्हणतात यशस्वी लोकांचं सर्वात मोठं लक्षण कोणतं असेल तर ते म्हणजे ते कधीही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांच्या वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी देखील ते आपलं कर्तव्य पूर्ण करतातच, आणि या जगात असेच लोक यशस्वी होतात. या उलट काही लोक असे असतात जे लोक आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडतो. असे लोक डोळे असूनही आंधळे असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विचार करण्यापूर्वीच निर्णय – चाणक्य म्हणतात जे लोक कोणताही विचार न करता निर्णय घेतात, किंवा आधी निर्णय घेतात आणि मग त्यावर विचार करतात, असे लोक डोळे असून देखील आंधळे असतात. असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आधी विचार करायला हवा आणि मग त्यानंतरच ती गोष्ट करायला हवी, ज्यामुळे तुमच्या यशस्वीतेची संधी वाढते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ध्येयाचा विसर – तसेच ज्या व्यक्तीला आयुष्यात ध्येयाचा विसर पडतो, ते सर्व डोळे असून देखील आंधळेच असतात, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती