बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर उद्यापासून सेवेत, थांबे आणि वेळापत्रक, भाडे सर्व काही चेक करा
बंगळुरू आणि मुंबई दरम्यान धावणारी वंदेभारत स्लीपर ट्रेन आठवड्यातून सहा दिवस सेवा देणार आहे. प्रवाशांची मागणी आणि सुविधांचा विचार करता ही ट्रेन १६ डब्यांची चालवण्यात येत आहे.

मुंबई ते बंगळुरु मार्गावर देशाची तिसरी वंदेभारत स्लीपर एक्सप्रेसला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. ही ट्रेन कर्नाटकची राजधानी बंगलुरु आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या दरम्यान सोमवारी २ नोव्हेंबरपासून आपल्या नियमित सेवा सुरु करत आहे.बंगळुरु- मुंबई वंदेभारत स्लीपर आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणार आहे. ज्यामुळे उत्तर कर्नाटकचे हे भागही जोडले जाणार आहे जे आधी रेल्वेने जोडले गेले नव्हते असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
आठवड्यात सहा दिवस धावणार
बंगलुरु आणि मुंबई दरम्यान धावणारी वंदेभारत स्लीपर ट्रेन आठवड्यातून सहा दिवस सेवा देणार आहे. बंगळुरु ते मुंबई जाणारी वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्याच्या सर्व दिवस धावणार आहे. तर मुंबई ते बंगळुरुला जाणारी वंदेभारत बुधवार वगळून आठवड्याच्या सर्व दिवस धावणार आहे.
मुंबईहून रात्री 8.10 वाजता सुटेल आणि दु.12.00 वाजता बंगळुरुत
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार बंगळुरु ते मुंबई जाणारी वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस ( ट्रेन क्रमांक – 27652 ) 3 नोव्हेंबर पासून सायंकाळी 7.45 वाजता बंगळुरुच्या सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनलहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहचेल. परतीची ट्रेन मुंबईहून बंगळुरुसाठी (ट्रेन क्रमांक – 27651) वंदे भारत स्लीपर 2 नोव्हेबरपासून रात्री 8.10 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता बंगळुरुच्या सर एम. विश्वेश्वरैया टर्मिनल स्थानकात पोहचेल.
अनंतपुर, रायचूर, पुणे, कल्याण सह या स्थानकांवर थांबे
बंगलुरू आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या या वंदेभारत स्लीपर ट्रेन आपल्या प्रवासात अनंतपुर, गुंतकल, रायचूर, यादगीर, कलबुर्गी, सोलापुर, पुणे आणि कल्याण स्थानका थांबा घेईल. प्रवाशांची मागणी आणि सुविधा ध्यानात घेऊन रेल्वेने ट्रेनमध्ये एकूण 16 डब्बे लावले आहेत. यात फर्स्ट क्लास एसीस सेकंड क्लास एसी आणि थर्ड एसी डब्यांचा समावेश आहे.
प्रवाशांची मागणी आणि सुविधांना लक्षात घेऊन या ट्रेनला १६ डबे लावले आहेत. जे एसी स्लीपर श्रेणीच्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत.
किती भाडे
या ट्रेनला बंगळुरु ते मुंबईचा प्रवास पूर्ण करण्यासाठी १६ तास १० मिनिटे लागणार आहेत. वंदेभारत स्लीपर ट्रेन बंगळुरु ते मुंबई थर्ड एसीचे भाडे २,८१० रुपये, सेकंड क्लास एसीचे भाडे ३,६३० रुपये आणि फर्स्ट क्लास एसीचे भाडे ४,४५० रुपये आहे.
