AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचे धडा धड हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आवाहन, युद्ध थांबवणार?, थेट इराण अमेरिका..

इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी भूमिका आता संपूर्ण जगाची आहे. अमेरिका आणि इराणकडून मोठे दावे केले जात आहेत. त्यामध्येच अनेक देशांमध्ये गॅस आणि तेलाचे संकट आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला.

इराणचे धडा धड हल्ले, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आवाहन, युद्ध थांबवणार?, थेट इराण अमेरिका..
Donald Trump
| Updated on: Mar 12, 2026 | 12:15 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील आणि त्याचा जगावर कसा परिणाम होणार याचा अजिबातच नेम नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर या युद्धाला सुरूवात झाली. इस्त्रायलकडून त्यावेळी सांगण्यात आले की, आम्ही जर इराणवर हल्ला केला नसता तर इराणने आमच्यावर हल्ला केला असता. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात हे युद्ध तीनच देशांपुरते मर्यादित राहिल, असे सांगितले जात होते. मात्र सर्वकाही त्याच्या उलट घडले. इराणने थेट आखाती देशांमध्ये मोठे बॉम्ब हल्ले केले. दुबई विमानतळावरही सतत हल्ले केले जात आहेत. या युद्धाचा स्पष्टपणे फटका सर्वच जगाला बसत आहे. युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या घडीला फक्त इराणचेच नुकसान होत नाही तर सर्वच देशांवर संकट कोसळले आहे.

इराणवर हल्ला करण्याचा निर्णय अमेरिकेचा चुकीचा होता असे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या नागरिकांकडूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकन सैन्याने अवघ्या 11 दिवसांत इराणची संरक्षण व्यवस्था जवळजवळ पूर्णपणे नष्ट केली. इराणने संपूर्ण जगाला वेढीस धरले असून होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद केली. यामुळे अनेक देशांमध्ये तेलाचा आणि गॅसचा मोठा प्रश्न उपस्थित राहिला. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठे विधान करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तेल कंपन्या आता कोणत्याही भीतीशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करू शकतात. कारण इराणी नौदल आता कोणताही धोका निर्माण करण्याच्या स्थितीत नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला असला तरीही वस्तूस्थिती ही आहे की, इराण जहाजांवर मोठे हल्ले करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, कारवाईच्या पहिल्या तीन तासामध्ये इराणचे हवाई दल उद्ध्वस्त झाले. डेटा शेअर केला की इराणकडे आता रडार किंवा विमानविरोधी काहीच नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे आता स्पष्टपणे बघायला मिळत आहे. कारण इराणकडून अजूनही मोठे हल्ले सतत केले जात आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच