AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! इराणची फक्त धमकीच नाही तर थेट करूनही दाखवले, मोठी खळबळ, तब्बल 13…

अमेरिका आणि इराण युद्ध टोकाला पोहोचले आहे. या युद्धाचा फटका जगाला बसत आहे. त्यामध्येच अमेरिका आणि इस्त्रायल इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले करत असताना आता इराणकडून जगाची झोप उडाली. पूर्ण जग तणावात आले.

जगात हाहाकार! इराणची फक्त धमकीच नाही तर थेट करूनही दाखवले, मोठी खळबळ, तब्बल 13...
trait of Hormuz attacks
| Updated on: Mar 12, 2026 | 11:01 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. मध्य-पूर्वेत युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. होर्मुजच्या खाडीतील अनेक जहाजांवर हल्ले होत आहेत. हे युद्ध मोठ्या प्रमाणात भडकले असून विविध देशांच्या जहाजाला पेटवले जात आहे. काल भारताच्याही एका जहाजाला पेटवण्यात आले. भारतातून युद्ध सराव करून इराणच्या दिशेने निघालेल्या युद्धनाैकेवर मोठा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला. त्यानंतर इराण अधिक आक्रमक बनल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुजच्या खाडीत स्थिती भयंकर बनली आहे. इराण होर्मुजच्या खाडी बंद करू शकत नाही, सर्वांनी हा मार्ग बिनधास्तपणे वापरा, असे अगोदरच अमेरिकेकडून सांगण्यात आले. मात्र, जहाजांचे मोठे जाम झाले. त्यामध्येच जे जहात होर्मुजच्या खाडीतून जात आहेत, अशांवर मोठा हल्ला इराणकडून केला जात आहे. त्याचा फटका भारताच्या जहाजाला देखील बसला. इतर देशांप्रमाणेच भारताच्या जहाजावरही कालच मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला.

इराणच्या या भूमिकेमुळे मोठे संकट निर्माण झाले. तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. सर्वत्र कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला. नुकताच मिळालेल्या माहितीनंतर मोठी खळबळ उडाली. जगाची चिंता वाढवणारी माहिती होर्मुजच्या खाडीतून येत आहे. इराणकडून करण्यात आलेल्या होर्मुजच्या खाडीतील तेल जहाजांवरील हल्ल्यानंतर थेट तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.

थायलॅंडच्या जहाजावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. यासोबतच युएईच्या समुद्र हद्दीपासून 25 मीटरच्या अंतरावर असलेल्या जपानच्या कंटेनरवरही मोठा हल्ला करण्यात आला. तिसरा हल्ला दुबईच्या उत्तर आणि पश्चिम 50 समुद्री अंतरावर करण्यात आला. खळबळजनक म्हणजे हा इराणकडून करण्यात आलेला 13 वा हल्ला आहे.

या हल्ल्यानंतर इराणने जागतिक बाजारपेठेची चिंता वाढवली आहे. तेहरानचे प्रवक्ते इब्राहिम जोलफाकरी यांनी थेट म्हटले की, आता तेलाची किंमत 200 डॉलर प्रति बॅरल होणार आहे, तयार राहा. पुढील काही दिवस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या घडामोडी घडणार हे स्पष्टच आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धात अनेक देश सध्या मोठ्या संकटात सापडल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच