AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही युद्ध जिंकलो… डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, डान्स करत थेट म्हणाले, काही तासातच…

अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका अनेक देशांना बसत असून मोठे संकट उभे आहेत. त्यामध्येच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

आम्ही युद्ध जिंकलो... डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, डान्स करत थेट म्हणाले, काही तासातच...
america and iran
| Updated on: Mar 12, 2026 | 9:58 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणपर्यंत हे युद्ध आता राहिले नसून या युद्धात अनेक देश भरडले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने ज्याचा विचारही केला नाही असे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेला आणि इराणला या युद्धात सळो की पळे इराणने केले. यासोबतच होर्मुज समुद्रीमार्ग इराणकडून बंद करण्यात आला. जे देश या युद्धापासून दूर राहण्याची भाषा करत होते, त्यांच्यावरही संकट कोसळले आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. ना त्यांच्याकडे गॅस आहे ना त्यांच्याकडे कच्चे तेल. भारतात देखील एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. बांगलादेशमध्येही पाकिस्तानसारखी स्थिती आहे. आखाती देशांवर आभाळातून संकट कोसळत आहे आणि खाण्यापिण्याचेही मोठे वांदे झालेत. भारतातून मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या आखाती देशात निर्यात होतात, इराणकडून महत्वाचा मार्ग बंद करण्यात आल्याने आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद आहे.

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर इराणने थेट ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये हल्ले केले. यावेळी अनेक तेल रिफायनरीलाही इराणकडून थेट टार्गेट करण्यात आले. ज्यानंतर आखाती देशांना मोठा झटका बसला. अमेरिका देखील आखाती देशांचे संरक्षण करू शकली नाही.

अमेरिकेने आणि इस्त्रायलने केलेल्या 28 तारखेच्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. या हल्ल्यात खामेनेई यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. त्यावेळी इराणला मोठा झटका बसला. आता इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराणसोबतचे युद्ध आम्ही सुरूवातीच्या काही तासाच जिंकलो होतो.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणसोबतच युद्ध काही तासाच जिंकले. आता फक्त अमेरिकेची सेना हे ऑपरेशन सुरू ठेवत आहे. केंटकीतील हेब्रॉन येथे एका रॅलीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की,  अमेरिकन सैन्याने आधीच विजय मिळवला आहे, परंतु वॉशिंग्टन अकाली माघार घेणार नाही. खूप लवकर जिंकलो असे म्हणणे आवडत नाही.. पण आम्ही जिंकले आहे… पहिल्या तासातच सर्व काही संपले होते, यावेळी डोनाल्ड ट्रम्प चक्क स्टेजवर डान्स करतानाही दिसले.

Follow Us
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा
राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये, यामागे... आर्थिक उलाढाल झाल्याचा 'सामना'त खळबळजनक दावा
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एक..
अंजली दमानियांनी शेअर केला व्हिडीओ; पार्थ पवारांसह सरकारला घेरलं, एकच प्रश्न...