AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडले, रशिया वेळेला धावून आला पण मैत्री विसरून उचलला फायदा, थेट 50 टक्के…

अमेरिका आणि इराण युद्ध भडकले असून पुढील काही आठवडे युद्ध सुरू राहणार आहे. इराणसोबत युद्ध लढण्याचा अमेरिकेचा निर्णय चुकल्याचे स्पष्ट आहे. त्यामध्येच आता या युद्धामध्ये जर कोणत्या देशाचा फायदा होत असेल तर तो रशिया आहे. मोठी आकडेवारी पुढे आली आहे.

भारताला ज्याची भीती तेच घडले, रशिया वेळेला धावून आला पण मैत्री  विसरून उचलला फायदा, थेट 50 टक्के...
Russia and india
| Updated on: Mar 12, 2026 | 9:01 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. इस्त्रायलकडून मोठे हल्ले इराणवर केले जात आहेत. मात्र, या हल्ल्यांचा काहीच परिणाम इराण होत नाही. इस्त्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांना जोरदार उत्तर इराण देत आहे. यासोबतच थेट आखाती देशांनाही टार्गेट इराणकडून केले जात आहे. सुरूवातीला जे देश अमेरिकेच्या बाजूने या युद्धात उतरण्याची भाषा बोलत होते आणि समर्थन करत होते, त्यासर्व देशांनी आता हातवर केल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जगातील अनेक देशांना वाटले की, इराण आणि इस्त्रायलपर्यंतच या युद्धाचा परिणाम राहिल. मात्र, या युद्धाचा वाईट परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. भारतात देखील एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. इराणकडून होर्मुज समुद्रीमार्ग बंद करण्यात आला. हा मार्ग बंद करण्यात आल्याने निर्यात आणि आयात सर्वकाही थांबले आहे. साैदी अरेबियासारख्या देशांकडे तर काही दिवस पुरेल इतकाच अन्नाचा साठा शिल्लक आहे.

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगातील सर्वात महत्वाच्या तेल मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून पूर्णपणे बंद करण्यात आला. जे कोणते जहाज येथून जाण्याचा प्रयत्न करत आहे ते जहाज थेट उडवले जात आहे. मग ते कोणत्याही देशाचे असो अमेरिकेने या मार्गाच्या मुद्द्यावरून इराणला मोठी धमकी दिली. मात्र, इराणने अमेरिकेच्या धमकीला भीक घातली नाही. इराण अधिक घातक होताना या युद्धात दिसत आहे.

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्धात सर्वात जास्त फायदा जर कोणत्या देशाचा होत असेल तर तो रशिया आहे. जगभरात सध्याच्या स्थितीला गॅस आणि तेलाची टंचाई झाली. आता रशियाच्या तेलाची मागणी वाढली आहे. या युद्धात रशियाची चांदी झाली. भारताला एक महिन्यांकरिता रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी अमेरिकेकडून देण्यात आली.

नुकताच मिळालेल्या हवालानुसार, मार्च महिन्यात भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात झपाट्याने वाढवली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे. यामुळे हे स्पष्ट झाले की, भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवणार नाही. मात्र, रशिया कित्येक वर्षांपासून भारताला कच्च्या तेलामध्ये जी सूट देत होते ती सूट देणे रशियाने बंद केले असून बाजार भावाप्रमाणेच भारताला रशियाकडून तेल खरेदी करावी लागत आहे. हा भारतासाठी रशियाने दिलेला मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल. मात्र, एलपीजी गॅसचे संकट अजूनही भारतावर कायम आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच