AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Kulkarni : त्या अभिनेत्यानं मला अयोग्यरित्या स्पर्श केला अन्…सोनाली कुलकर्णीनं सांगितला प्रसंग

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीनं नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्याचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Sonali Kulkarni : त्या अभिनेत्यानं मला अयोग्यरित्या स्पर्श केला अन्...सोनाली कुलकर्णीनं सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 01, 2026 | 7:49 PM
Share

मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं चित्रपटसृष्टीतील काही कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे. एका सहकलाकारानं तिला अयोग्य पद्धतीनं स्पर्श केल्याचा प्रसंग आणि एका दिग्दर्शकानं चित्रपटाची कथा ऐकवण्याच्या निमित्तानं केलेली विचित्र मागणी, याबद्दल सोनालीनं नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं आहे.

सोनाली कुलकर्णीनं सांगितला प्रसंग

चित्रपटाच्या सेटवर काम करताना कलाकारांना अनेक प्रकारच्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं. काही वेळा सहकलाकारांकडून होणारे अयोग्य वर्तनही सहन करावं लागतं. मात्र, अशा प्रसंगांमध्ये गप्प बसण्याऐवजी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणं महत्त्वाचं असल्याचं सोनाली कुलकर्णीनं सांगितलं.

चित्रपट सेटवर होणाऱ्या अयोग्य वर्तणुकीबद्दल बोलताना, सोनाली कुलकर्णीनं सांगितलं की, तिला अशा काही सहकलाकारांचा सामना करावा लागला आहे ज्यांनी वैयक्तिक सीमांचं उल्लंघन केलं होतं. अभिनेत्रीनं सांगितलं की, गप्प बसण्याऐवजी तिनं त्या परिस्थितीचा सामना करण्याचं ठरवलं. ‘मी अशा सहकलाकारांना पाहिलं आहे, ज्यांनी अयोग्य स्पर्श केला आहे. अशा वेळी माझ्याकडे त्यांना ठामपणे सांगण्याचं धैर्य होतं, ‘काका, तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे, तुम्ही असं वागू शकत नाही’ असं सोनाली म्हणाली. त्या अभिनेत्यानं तिची माफीसुद्धा मागितली, असं सोनालीनं सांगितलं.

‘मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनी माझी मनापासून माफीसुद्धा मागितली. त्यामुळे, मला कधीही असं वाटलं नाही की, मी हे प्रकरण सार्वजनिक करून गोंधळ निर्माण करावा. पण त्यांना तो धडा मिळाला जो त्यांना मिळायला हवा होता. स्त्रियांनी स्वतःच्या सीमा निश्चित करायला शिकलं पाहिजे आणि जेव्हा एखादी गोष्ट त्यांना अस्वस्थ करते, तेव्हा त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.’ स्वतःच्या बाजूनं नेहमी ठाम उभं राहण्यामागचं कारण स्पष्ट करताना सोनाली म्हणाली की, गप्प राहिल्यामुळे अशा प्रकारच्या वर्तणुकीला प्रोत्साहन मिळू शकतं.  ‘झूम‘ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णी बोलत होती.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती