AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : फक्त बोलून नाही तर करुन दाखवलं, शरद पवारांचा मोठा निर्णय, दुष्काळग्रस्त गावासाठी थेट चेक दिला

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी माढा तालुक्यापासून दौऱ्याला सुरुवात केली. तुळशी गावातील भीषण पाणीटंचाईची स्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी गावासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Sharad Pawar : फक्त बोलून नाही तर करुन दाखवलं, शरद पवारांचा मोठा निर्णय, दुष्काळग्रस्त गावासाठी थेट चेक दिला
Sharad Pawar NewsImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 7:29 PM
Share

राज्यामध्ये यंदा दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे. राज्यातील ३५८ तालुंक्यापैकी तब्बल ३०५ तालक्यांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमिवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातुन दुष्काळ पाहणी दौर्याला आजपासून सुरुवात केली आहे. ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. पंढरपूरनंतर आज ते सोलापूर माढामध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन ५० लाख रूपयांची मदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

फळबागा नुकसाना संदर्भात लवकरात लवकर मदत करावी, दुष्काळी तीव्रता लक्षात घेता तीन दिवसीय अधिवेशन बोलवावे आणि उपाययोजना कराव्यात, अशा अनेक मागण्याचे पत्र पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. दुष्काळी भागातील समस्या खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान यांच्याकडे मांडणार आहेत. दुष्काळ संदर्भात अनेक अडचणी आहेत. रस्त्याने येताना पाहिले की सर्व पिके वाळून गेली आहेत, माढा तालुक्यातील ज्या समस्या मांडल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असंही यावेळी पवार म्हणाले. 1972 ला असाच दुष्काळ होता आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. सरकारकडून आम्ही त्याकाळी शेतकऱ्यांना जमेल अशी मदत केली होती.

माढ्याच्या तुळशी गावाला शरद पवारांनी भेट देऊन गावाची भीषण पाणी टंचाई जाणून घेतल्यानंतर पवारांनी ५० लाखांचा धनादेश देऊन गावाला मदत जाहीर करुन मदतीचा हात दिला. मागील अनेक वर्षापासून गावची पाणी टंचाई मिटली नसल्याने तुळशी गावकर्यानी गाव विकायला काढले होते. पवारांनी गावाची दुष्काळाची दाहकता पाहून बघ्याची भूमिका न घेता थेट ५० लाखांची आर्थीक मदत दिल्याने गावकर्यानी पवारांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, या दुष्काळामध्ये सरकार शेतकऱ्यांच्यासोबत आहे, असं म्हणत सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत म्हणून ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पवारांच्या दौऱ्याला बारामतीतून सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवस सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील परिस्थितीचा पवार आढावा घेणार आहेत.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती