AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : स्वप्नात या गोष्टी वांरवार दिसतायेत? मग समजून जा लवकरच होणार धन प्राप्ती, वास्तुशास्त्र काय सांगतं?

सर्वसामान्यपणे आपण दिवसभरात ज्या गोष्टी पहातो, ज्या गोष्टींचा विचार करतो, या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत असं आपल्याला मनातून वाटत असतं, त्या गोष्टी शक्यतो आपल्याला रात्री झोपेत स्वप्नात देखील दिसतात. या गोष्टींना फार काही अर्थ नसतो, मात्र जर एखादी गोष्ट तुम्हाला स्वप्नात वारंवार दिसत असेल तर त्यामागे काही तरी विशिष्ट संकेत असू शकतात.

Vastu Shastra : स्वप्नात या गोष्टी वांरवार दिसतायेत? मग समजून जा लवकरच होणार धन प्राप्ती, वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तूशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 7:46 PM
Share

तुम्ही कधी विचार केला आहे का? की आपल्याला स्वप्नं का पडतात? अनेकांनी अनुभव घेतला असेल की ते दिवसभर ज्या गोष्टींचा विचार करत होते, किंवा एखाद्या गोष्टीची अतिशय अतुरतेनं वाट पाहत होते, त्याच गोष्टी अनेकदा त्यांना स्वप्नात दिसतात. म्हणूनच एक म्हण आहे, मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे तुम्ही दिवसभर जो -जो विचार करता, त्या त्या गोष्टी तुम्हाला रात्री स्वप्नात दिसण्याची दाट शक्यता असते. खरं तर वास्तुशास्त्रानुसार अशा स्वप्नाला फार अर्थ नसतो. परंतु अशी देखील काही स्वप्न असतात, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भविष्याबाबत काही विशिष्ट संकेत मिळत असतात. हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. आज आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून अशा प्रकारचे विशिष्ट संकेत मिळत असतात.

देवी देवतांचे फोटो – वास्तुशास्त्रानुसार स्वप्नात देवी -देवता येणं किंवा देवी, देवतांचे फोटो येणं हे एक अतिशय शुभ संकेत देणारं स्वप्न आहे. जर तुमच्या आयुष्यात काही फार मोठे सकारात्मक बदल घडणार असतील, तुम्हाला अकस्मात धन प्राप्ती होणार असेल तर अशा स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे संकेत मिळत असतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. स्वप्नात देवी -देवता येणं किंवा त्यांच्या प्रतिमा येणं हे एक अतिशय शुभ स्वप्न आहे, असं वास्तुशास्त्र सांगतं.

स्वप्नात पक्षी दिसणे – जर तुमच्या स्वप्नात गरुड, भारद्वाज या सारखे पक्षी दिसले तर हे देखील एक शुभ स्वप्न आहे. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होणार आहेत. तुम्ही उंच हवेत भरारी घेणार आहात. जर तुमचं अनेक दिवसांपासून एखादं मोठं काम अडलं असेल तर ते आता लवकरच मार्गी लागेल असा या स्वप्नाचा अर्थ होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

अथांग पाणी – वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात अथांग पाणी दिसलं तर हे देखील एक शुभ स्वप्न आहे. याचा अर्थ आता लवकरच तुमच्या पाठीमागची चिंता दूर होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती