tv9 Marathi Special Report | युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका–इराण–इस्रायल संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाल्याचे चित्र आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने वादविवादही होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरू केले आहे. नागरिकांची वाढती गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी पोलीस उपस्थितीतच सिलेंडरचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सध्या तरी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Published on: Mar 12, 2026 10:53 AM
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली

