Vidhan Bhavan | विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत खळबळ
एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण आहे. अशातच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील विधानभवनासह मेट्रो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही धमकी देण्यात आली आहे.
एकीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावाचे वातावरण आहे. अशातच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील विधानभवनासह मेट्रो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही धमकी देण्यात आली आहे. हा ई-मेल सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मेलमध्ये मिसाईल आणि बॉम्बचा वापर करून संबंधित ठिकाणे उडवून देण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा मेल खलिस्तानी समर्थकांशी संबंधित असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ई-मेल मिळताच गृह विभाग आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. विधानभवन परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिक आणि कर्मचारी यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या मुंबई पोलीस आणि संबंधित तपास यंत्रणा या ई-मेलची चौकशी करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अशी धमकी मिळाल्यामुळे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती

