निवडणुकीच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक, हॅकर्सकडून पैशांची मागणी

| Updated on: Oct 29, 2020 | 12:00 AM

रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहिलेले अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईटच हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या रुपात पैसेही मागितले आहेत. (Donald Trump's website hacked by hackers)  

निवडणुकीच्या तोंडावर डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक, हॅकर्सकडून पैशांची मागणी
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी (American Presidential Election) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. अशातच रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीसाठी उभे राहिलेले अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची वेबसाईटच हॅक झाल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे वेबसाईट मंगळवारी हॅक केल्यानंतर हॅकर्सने क्रिप्टोकरन्सीच्या रुपात पैसेही मागितले आहेत. (Donald Trump’s website hacked by hackers)

याबाबत अधिक माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते टीम मुर्तो म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक झाली होती. वेबसाईट हॅक करण्यामागे कुणाचा हात होता? हॅकर्सचा मुख्य स्त्रोत कुठे आहे?, या सर्व प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही शोधत आहोत. आमच्याकडची संवेदनशील माहिती आम्ही साईटवर अपलोड केलेली नव्हती. त्यामुळे आमच्याकडचा डेटा एकदम सुरक्षित आहे. काही काळानंतर हॅकर्सने ट्रम्प यांची वेबसाईट पुन्हा पुर्वरत केली.”

हॅकर्सने लिहलं खोट्या बातम्यांपासून सावधान

डोनाल्ड ट्रम्प यांची वेबसाईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने ट्रम्प यांच्यावर वेगवेगळे आरोप केले. त्याने हे सर्व आरोप ट्रम्प यांच्या वेबसाईटवर लिहिले. तसेच ट्रम्प यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या संपूर्ण विश्वाने पाहिल्या आहेत. आता खरं काय ते जाणून घेण्याची वेळ आली आहे. असंही हॅकर्सने ट्रम्प यांच्या वेबसाईटवर लिहीलं.

हॅकर्सने ट्रम्प प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले. ट्रम्प यांच्याकडून या निवडणुकीत घातपात केला जात आहे; तसेच कोरोनाचा उगम ट्रम्प प्रशासनामुळेच झाला, असे अनेक गंभीर आरोप या हॅकर्सने केले आहेत. तसेच आम्ही केलेल्या सर्व आरोपांचे पुरावेही आमच्याकडे असल्याचा दावा या हॅकर्सने केला आहे. कालांतराने त्यांनी ही वेबसाईट पुन्हा ट्रम्प प्रशासनाला सुपूर्त केली.

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांची वेबसाईट हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून हॅकर्सचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या :

Donald Trump | ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अकाऊंट ब्लॉक

Donald Trump | डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडीओ वायरल, आपण पाहिला का?

चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

(Donald Trump’s website hacked by hackers)