चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना महामारीला चीनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

चीनला कोरोना महामारीची मोठी किंमत मोजावी लागेल; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 10:14 AM

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी कोरोना महामारीला चीनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, चीन जगासोबत ज्या प्रकारे वागला आहे, त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ट्रम्प बोलत होते. (China to pay a big price for spreading COVID-19 globally say Donald Trump)

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून ते अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. परंतु, अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा परतले आहेत. दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओत म्हटले आहे की, मला झालेला कोरोना म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद आहे, कारण त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळालं आहे. या रोगावरील उपचारासाठीच्या संभाव्य औषधांबाबत मला शिकायला मिळालं.

आतापर्यंत संपूर्ण जगाला कोरोनाचा फटका बसला आहे. साडेतीन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. कोरोनामुळे जगातील सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी असून तिथे कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

ट्रम्प अमेरिकन नागरिकांना म्हणाले की, कोरोना महामारीला आपल्यापैकी कोणीही जबाबदार नाही. कोरोनाला केवळ चीनच जबाबदार आहे. चीनमुळेच जगाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्यामुळेच जगाला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. मात्र, चीनलादेखील याची किंमत चुकवावी लागेल. असे म्हणत त्यांनी देशातील नागरिकंना धीर देण्याचा प्रयत्न केला.

निवडणुकीपूर्वी वॅक्सीन मिळणार?

कोरोनावरील वॅक्सीनबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, लवकरात लवकर आपल्याला कोरोनावरील वॅक्सीन मिळेल. मला वाटतंय की, निवडणुकांपूर्वी आपल्याला वॅक्सीन मिळायला हवं. परंतु यावरुन सध्या राजकारण केलं जात आहे. ठिक आहे, त्यांना त्यांचा खेळ खेळू द्या.

संबंधित बातम्या 

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन

Nepal PM Corona | नेपाळचे पंतप्रधान के पी ओलींना कोरोना, सुरक्षेसाठी तैनात 76 जवानही बाधित

(China to pay a big price for spreading COVID-19 globally say Donald Trump)

Non Stop LIVE Update
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.