बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर

बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

बाप्पाच्या आगमनावेळी विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर
| Updated on: Aug 28, 2019 | 7:58 PM

गांधीनगर : गणपतीची मूर्ती (Ganesha Festival) आणत असताना विजेचा धक्का लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. गुजरातच्या (Gujrat) भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे हा अपघात घडला. अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथे बुधवारी (28 ऑगस्ट) गणपतीची मूर्ती आणत असताना वरील विजेच्या तारेशी संपर्क झाल्याने सात जणांना विजेचा जोरदार धक्का लागला. या अपघातात (Gujrat major accident) दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अंकलेश्वरच्या आदर्श मार्केट येथील एका ठिकाणी गणेश चतुर्थी पूजा मंडपात ही गणेशाची 26 फुटांची मूर्ती नेली जात होती. बाप्पाच्या आगमनावेळी विजेची तारं बांबूने बाजुला करत असताना या तरुणांना विजेचा जोरदार धक्का लागला. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात अमित आणि कुणा या दोघांचा मृत्यू झाला आहे.