“कार्यालयात मुलांचा फोटो लावा, निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे पाहा”

नवी दिल्ली : भारतामध्ये पक्षाचा अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेत्यांचा फोटो कार्यालयात लावण्याची पद्धत आहे. पक्षाच्या नेत्याचा मंत्र्यांकडून त्यांच्या कार्यालयात मोठा फोटो लावला जातो. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेल्या आवाहनामुळे त्यांचं जगभरात कौतुक होतंय. माझ्याऐवजी तुमच्या मुलांचा फोटो कार्यालयात लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी मुलांकडे पाहा, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं. तुमच्या कार्यालयात माझे फोटो […]

कार्यालयात मुलांचा फोटो लावा, निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्याकडे पाहा
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 9:02 PM

नवी दिल्ली : भारतामध्ये पक्षाचा अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेत्यांचा फोटो कार्यालयात लावण्याची पद्धत आहे. पक्षाच्या नेत्याचा मंत्र्यांकडून त्यांच्या कार्यालयात मोठा फोटो लावला जातो. पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेल्या आवाहनामुळे त्यांचं जगभरात कौतुक होतंय. माझ्याऐवजी तुमच्या मुलांचा फोटो कार्यालयात लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी मुलांकडे पाहा, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं.

तुमच्या कार्यालयात माझे फोटो असावेत असं मला खरोखर वाटत नाही. मी राष्ट्राध्यक्ष आहे. एखादी मूर्ती किंवा आदर्श नाही. माझ्याऐवजी कार्यालयात तुमच्या मुलांचे फोटो लावा. प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मुलांकडे पाहा, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलंय. जगभरात एक व्यक्ती केंद्रीत पक्ष किंवा सरकार आपण पाहतो. त्यामुळेच काही तरी वेगळं करत समाजासाठी चांगलं काम करता यावं यासाठी झेलेन्स्की यांनी हे आवाहन केलं, ज्याचं कौतुक होतंय.

झेलेन्स्की यांनी त्यांच्या पक्षाची नोंदणी गेल्या वर्षीच केली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आणि ते थेट राष्ट्राध्यक्ष झाले. झेलेन्स्की हे कॉमेडियन आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. कला क्षेत्रातील त्यांच्या प्रसिद्धीने राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत जाण्यास मदत केली. यूक्रेनसारख्या नेहमीच विविध संघर्षांमुळे चर्चेत राहणाऱ्या देशाचू सूत्र झेलेन्स्की यांनी हाती घेतली आहेत.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.