वनहक्क धारकांना बॅंकांकडून कर्ज मिळणार, मंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती

| Updated on: Nov 18, 2020 | 10:07 AM

वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकेकडून कर्ज मिळणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

वनहक्क धारकांना बॅंकांकडून कर्ज मिळणार, मंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती
Follow us on

मुंबई:  वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकेकडून कर्ज मिळणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात वनहक्क धारकांना कर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याने तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माहिती दिली. (Holders of forest rights will get loans from banks)

बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, आदिवासी संशोधन व विकास संस्थेच्या सहसंचालिका जागृती कुमरे, अवर सचिव रविंद्र गोरवे, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक वालावलकर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापक करपे आदी उपस्थित होते.

वैयक्तिक वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, बॅंका वनहक्क धारकांना कर्ज उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ करत असल्याने लाभार्थी कर्जापासून वंचित राहत होता. हे लक्षात घेता आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी, बॅंक व्यवस्थापक आणि आदिवासी विकास विभागांच्या अधिकाऱ्यांना पात्र लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे निर्देश दिले.

शासन बॅंकांना लागणारी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. त्यानंतर बॅंकांनी राज्यमंत्र्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे वनहक्क प्राप्त धारकांना बॅंकाकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Holders of forest rights will get loans from banks)

संबंधित बातम्या

कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी, प्राजक्त तनपुरेंनी घेतली आंदोलकांची भेट

मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या दाव्यानंतर कर्डिलेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, शिवाजी कर्डिले म्हणतात…