पाकिस्तानात परफॉर्म करणार, बघू कोण थांबवतंय, शिल्पा शिंदेकडून मिका सिंहची पाठराखण

| Updated on: Aug 24, 2019 | 10:56 AM

पाकिस्तानचा व्हिसा मिळाला तर आम्ही परफॉर्म करणारच, बघू कोण थांबवतंय, अशा शब्दात अंगुरी भाभी फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मिका सिंगवर बंदी आणणाऱ्या असोसिएशन्सना चॅलेंज केलं आहे.

पाकिस्तानात परफॉर्म करणार, बघू कोण थांबवतंय, शिल्पा शिंदेकडून मिका सिंहची पाठराखण
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 11’ची विजेती आणि मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) गायक मिका सिंगच्या (Mika Singh) बचावासाठी पुढे आली आहे. पाकिस्तानचा व्हिसा मिळाला तर आम्ही परफॉर्म करणारच, बघू कोण थांबवतंय, अशा शब्दात शिल्पाने चॅलेंज केलं आहे. माझ्यासारखे अनेक जण तुमच्या पाठीशी आहेत, आम्ही तुमच्यासोबत काम करु, अशा शब्दात शिल्पाने मिकाला आश्वस्त केलं.

शिल्पाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम, ट्विटरवर वायरल झाला आहे. ‘पाजी, तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तुमच्यावर कोणीही बंदी आणू शकत नाही. बॅन हा शब्द एकदम चुकीचा आहे. सुरेश गुप्तांसारखे अनेक जण आहेत. त्यांचं काही अस्तित्व नाही.’ असं शिल्पा या व्हिडीओमध्यो बोलताना दिसते.

‘सिने वर्कर्स असोसिएशनला त्यांच्या आर्टिस्ट्सचं होणारं शोषण थांबवण्यासाठी काहीतरी करायला सांगा. इंडस्ट्रीत कोणी कोणावर बंदी आणू शकत नाही. भारत-पाकिस्तानमध्ये तणाव होता. आम्हाला व्हिसा मिळाला, आम्ही गेलो. आमची मैत्री आम्ही निभावणारच. आम्ही भारताचे नागरिक आहोत. आमचं हृदय विशाल आहे’ असंही ती पुढे म्हणते.

‘मी तुमच्या सोबत आहे. मी तुमच्यासोबत काम करेन. बरेच कलाकार तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत. तुम्हाला मला काम द्यायचं असेल, तर देऊ शकता’ असंही शिल्पाने व्हिडीओच्या अखेरीस म्हटलं.

मिका सिंगने देशाची माफी मागितली होती. मला व्हिसा मिळाला, म्हणून मी गेलो. माझ्या जागी दुसरं कोणी असतं, तर तोही गेला असता, असं मिका म्हणाला होता. मिकावरील बंदी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी’ने हटवली आहे.

पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल गायक मिका सिंगवर (Mika Singh) ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी’ने (FWICE) बंदी घातली होती. मिका सिंगसोबत काम करणारे सिनेसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांवरही बंदी घालण्यात येईल, असं पत्रक फेडरेशनने काढलं होतं.

भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात 8 ऑगस्ट रोजी मिकाने गाणी सादर केली होती. त्यामुळे मिकावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती.

मिकावर सिने इंडस्ट्रीतील सर्वात मोठी संस्था ‘एफडब्लूआयसीई’ने थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मिकाने माफी मागण्याची तयारी दाखवली. हो-नाही करता करता माफीनामा कबूल झाला आणि मिकावरील बंदी हटवण्यात आली.

‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत अंगुरी भाभीच्या मुख्य भूमिकेत झळकलेल्या शिल्पा शिंदेने मालिका सोडली होती. यावेळी निर्मात्यांसोबत झालेल्या वादानंतर तिच्याविरोधात ‘सिन्टा’मध्ये तक्रार करण्यात आली होती. शिल्पावर टीव्ही इंडस्ट्रीत आजीवन बंदी घालण्याची तयारी सुरु होती.